(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
या वर्षी अहमदाबाद येथे २०२५ चा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला, जिथे “लापता लेडीज” ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला एकूण १३ पुरस्कार मिळाले आणि तो वर्षातील सर्वात चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक मानला गेला. परंतु, या भव्य कार्यक्रमानंतर, “द केरळ स्टोरी” चे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी संपूर्ण सोहळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सोशल मीडियावर फिल्मफेअरवर टीका केली आणि म्हटले की हा सिनेमा नाही तर एक तमाशा आहे.
सुदिप्तो सेन यांचे टीकात्मक विधान
सुदिप्तो सेन यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका लांबलचक नोटमध्ये सेन म्हणाले की फिल्मफेअरने या वर्षी भारतीय चित्रपटातील काही सर्वोत्तम कामांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या मते, “एका चोरीवर आधारित चित्रपट, हिंसाचार शिकवणारा चित्रपट आणि बॉक्स ऑफिसवर तीन दिवसही टिकू न शकलेला चित्रपट या सर्वांनी असंख्य पुरस्कार जिंकले आहे. यावरून स्पष्ट होते की खऱ्या कामाला कोणतीही मान्यता मिळत नाही.” असे ते म्हणाले.
मुलगा की मुलगी? कॉमेडियन भारती सिंगने परदेशात केली बाळाची लिंग तपासणी? स्वतःच सोडले मौन
सुदिप्तो पुढे म्हणाले की फिल्मफेअर सारख्या संस्था प्रत्यक्षात ग्लॅमर आणि स्टार पॉवरला समर्पित असतात, सिनेमाच्या कलेसाठी समर्पित नसतात. ते म्हणाले, “हा तोच समुदाय आहे जो खरा सिनेमा स्वीकारण्यास कचरतो. मला आनंद आहे की आम्हाला या तमाशाचा भाग व्हायचे नव्हते.”
“आम्हाला बनावट हास्य आणि कृत्रिम मैत्रीपासून वाचवले गेले.” – सुदिप्तो सेन
सुदिप्तो सेन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की लोक केवळ दिखाव्यासाठी हसतात अशा कार्यक्रमांचा भाग न होण्याचा त्यांना अभिमान आहे. त्यांनी लिहिले, “कमीतकमी आम्हाला बनावट हास्य, कृत्रिम नातेसंबंध आणि फोटो काढण्याच्या सक्तीपासून वाचवले गेले. मुंबई आणि कान्स सारख्या ठिकाणी दाखवल्या जाणाऱ्या बनावट ग्लॅमरपासून दूर राहणे हा दिलासादायक आहे.”
कोणत्या चित्रपटांना लक्ष्य केले गेले?
सुदिप्तो यांनी थेट नावे घेतली नसली तरी, सूत्रांनी सांगितले की ते “लापता लेडीज,” “किल,” आणि “आय वॉन्ट टू टॉक” सारख्या चित्रपटांचा संदर्भ देत होते. सुदिप्तो यांनी थेट कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांनी फिल्मफेअरबद्दल निश्चितच प्रश्न उपस्थित केले. तसेच त्यांचे हे विधान आता चर्चेत आले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर वाढल्या अपेक्षा
गेल्या महिन्यातच, “द केरळ स्टोरी” ला राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये दोन मोठे सन्मान मिळाले. सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि चित्रपटाला सर्वोत्कृष्ट छायांकन पुरस्कार मिळाला. या चित्रपटात केरळमधील महिलांची कहाणी दाखवण्यात आली आहे ज्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यात आला होता आणि दहशतवादी संघटना ISIS शी जोडले गेले होते.