(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने अलीकडेच तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्राच्या वाढदिवसानिमित्त एक खास सोशल मीडिया पोस्ट शेअर केली, जी सध्या इंटरनेटवर तुफान चर्चेत आहे. या पोस्टमध्ये केवळ दोघांचे गोड फोटो आणि व्हिडिओच नव्हते, तर काही चाहत्यांच्या मते, तिचं कॅप्शन हे करणची माजी गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरवर अप्रत्यक्ष टोला आहे.
तेजस्वीने करणसोबतचे काही सुंदर फोटो आणि क्षण शेअर करत लिहिलं:”आता तो फक्त राइट स्वाइपच करतो… माझ्या स्वप्नातील राजकुमाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @kkundrra”हे कॅप्शन वाचून सोशल मीडियावर फॅन्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहींनी तेजस्वीच्या या स्टाईलचं भरभरून कौतुक केलं.या पोस्टखाली अनेक चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. काहींनी थेट अनुषा दांडेकरचा उल्लेख करत या कॅप्शनला “परफेक्ट रिटर्न गिफ्ट” असं म्हटलं आहे.
Bigg Boss 19: अमालने रागाने फेकली फरहानाची प्लेट, भडकला सलमान खान; ‘वीकेंड का वार’ मध्ये घडणार काय?
अभिनेत्री आणि मॉडेल अनुषा दांडेकर हिने अलीकडेच आपल्या यूट्यूब पॉडकास्ट ‘Unverified’ च्या एका एपिसोडमध्ये तिच्या भूतकाळातील नात्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. हे आरोप करण कुंद्रावर असल्याचा अंदाज अनेक चाहत्यांनी व्यक्त केला असून, सोशल मीडियावर या वक्तव्यांवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी अनुषाने सांगितले”माझा डेटिंग अॅपसाठी एक कॅम्पेन सुरू होता. मी त्यालाहीया कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं. त्याला यामधून आयुष्यात सर्वात जास्त पैसे मिळाले.”पण त्यानंतर तिने धक्कादायक खुलासा केला की,”तोच डेटिंग अॅप वापरून तो मुलींशी बोलत होता, त्यांना भेटत होता, आणि हे सर्व आम्ही एकत्र कॅम्पेन करत असताना घडत होतं!पुढे अनुषाने सांगितलं, “जेव्हा मला कळलं की तो संपूर्ण मुंबईसोबत झोपत होता, तेव्हा मी हादरले. वाटायचं आपण दोघं एकमेकांसाठी आहोत… पण सत्य खूप वेगळं निघालं.”
करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर यांचं नातं एकेकाळी टेलिव्हिजन विश्वातील सर्वाधिक चर्चेत असलेलं नातं होतं. अनेक वर्षं दोघं एकत्र होते, त्यांच्या केमिस्ट्रीची सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली होती. मात्र, 2020 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला, आणि नंतर त्यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे आणि आरोप-प्रत्यारोप समोर आले.
ब्रेकअपनंतर करणची भेट अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसोबत ‘बिग बॉस 15’ च्या सेटवर झाली. इथेच त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात झाली आणि पुढे दोघं टेलिव्हिजनमधील सर्वात चर्चिलेल्या जोडप्यांपैकी एक ठरले.