(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बहुप्रतिक्षित रोमँटिक कॉमेडी “सुस्वगतम् खुशामदीद” चा टीझर आज अधिकृतपणे रिलीज झाला आहे. पुलकित सम्राट आणि इसाबेल कैफ स्टारर चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा हचित्रपट प्रेम, एकता आणि स्वीकार्यतेचा हृदयस्पर्शी संदेश देण्याचे वचन देतो. टीझरमध्ये एक दमदार संवाद आहे जो चित्रपटाच्या भावनेचा सारांश देतो. “मेरा वतन है हिंदुस्तान, ज्याचे संविधान मानते की काळे, गोरे, हिंदू, मुस्लिम यांच्यात कोणताही भेद नाही. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते, तेव्हा तो त्याचा हक्क आहे. तिचे आयुष्य तिच्यासोबत जगायचे आणि माझ्या संविधानाने मला हा अधिकार दिला आहे.” हा संवाद या चित्रपटाची ताकत आहे असे म्हणता येईल.
या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेता पुलकित सम्राट म्हणाला, ‘सुस्वगतम् खुशमदीद’ हा आपल्या देशातील विविधतेचा उत्सव आहे. इसाबेल आणि आमचे दिग्दर्शक धीरज जी यांच्यासोबत काम करणे हा एक संस्मरणीय अनुभव होता. टीझर आता प्रदर्शित झाला आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना तो आवडेल. आणि आमच्यासोबत प्रेमाचा विजय साजरा करतील.” असे अभिनेत्याने सांगितले.
नूरची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या इसाबेल कैफने तिचा उत्साह व्यक्त केला आणि म्हणाली, “एवढ्या सुंदर कथेचा एक भाग बनून मी रोमांचित आहे. पुलकित आणि संपूर्ण टीमसोबत काम करणे हा एक अद्भुत प्रवास होता. मला आशा आहे की प्रेक्षकांना टीझर नक्की आवडेल. आम्ही चित्रपट बनवताना जेवढे प्रेम दिले तेवढेच प्रेमही प्रेक्षकांना देऊ.” असे अभिनेत्री म्हणाली.
दिग्दर्शक धीरज कुमार यांनी या चित्रपटाबद्दलची आपली दृष्टी शेअर करताना म्हटले आहे की, ‘सुस्वगतम् खुशमदीद’ हा चित्रपट आहे ज्याचा उद्देश प्रेम आणि एकतेचा संदेश पसरवण्याचा आहे. ज्या वेळी विभाजन दिसून येते, तेव्हा हा चित्रपट आपल्याला आठवण करून देतो की प्रेम सर्व सीमा ओलांडते. मी आणि माझ्या टीमने जे काही साध्य केले त्याचा मला अभिमान आहे आणि ते जगासोबत शेअर करण्यास उत्सुक आहे.” असे ते म्हणाले.
हे देखील वाचा- ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच; टायगर श्रॉफ झळकणार एसीपी सत्याच्या भूमिकेत!
पुलकित सम्राट, इसाबेल कैफ, साहिल वैद, प्रियांका सिंग, ऋतुराज सिंग, मेघना मलिक, स्वर्गीय अरुण बाली, नीला मुल्लेरकर, मनु ऋषी चड्ढा, राजकुमार कनौजिया, मेहुल सुराणा, राजेश शर्मा यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहे. हृदयस्पर्शी रोमँटिक कॉमेडी “सुस्वगतम् खुशमदीड” चित्रपट २२ नोव्हेंबरला चित्रपगृहात दाखल होणार आहेत. सिनेपोलिस इंडियाने संपूर्ण भारतात वितरित केलेला हा चित्रपट हशा, प्रेम आणि एक शक्तिशाली संदेश देणारा आहे.