(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भय – द गौरव तिवारी मिस्ट्री या आगामी शोधात्मक अलौकिक रोमांचक कथेचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अॅमेझॉन एमएक्स प्लेअर ही अॅमेझॉनची मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा असून त्यांना हा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. भारतात सर्व प्रथम पॅरानॉर्मल गोष्टींचा शोध गौरव तिवारी यांनी घेतला होता आणि या मालिकेला त्यांचे जीवन आणि त्यांच्या कार्याशी संबंधित वास्तविक घटनांपासून प्रेरणा लाभलेली आहे. या मालिकेत करण टॅकर यांनी गौरव तिवारी यांची आणि कल्की कोचलिन आयरीन वेंकट यांची मुख्य भूमिका साकारलेली आहे. तसेच या मालिकेत दानिश सूद, सलोनी बत्रा, शुभम चौधरी, आणि निमिषा नायर यांसह एक उत्कृष्ट कलाकारांची टीम पहायला मिळते. रॉबी ग्रेवाल यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. तर ही मालिका नोंदविलेल्या प्रकरणांवर आणि वास्तविक घडलेल्या पॅरानॉर्मल शोधांद्वारे प्रेरित आहे आणि त्यावर आधारित आहे.
या ट्रेलरची सुरुवात एका तणावपूर्ण जागेवरील शोध घेण्याने होते जी प्रेक्षकाला गौरव यांनी कधीतरी अनुभवलेल्या जगात थेट घेऊन जाते. अस्पष्ट हालचालींची लुकलुक, संकटात केलेले कॉल्स, बॅटऱ्या संपणे, अवतीभोवती आत्मा फिरणे, आणि विरोधाभासी कथा या गोष्टी त्यांनी पायलट म्हणून सुरु केलेला प्रवास आणि ते इंग्लंडमधील तत्वज्ञानविषयक चर्चकडे आकर्षित होऊन अखेरीस भारताचे पहिले पॅरानॉर्मल अधिकारी बनले असा जीवन बदलणारा अनुभव एकत्र दाखवितात. कथेत त्यांनी केलेले संघर्ष आधी पहायला मिळतात, नंतर सहकाऱ्यांना त्यांच्या बाबतीत आलेले संशय, कुटुंबाविषयी चिंता, आणि अज्ञात गोष्टींचा सामना करताना आलेला भावनिक बोजा इ. सादर केले आहे आणि हे सर्व वास्तविक प्रकरणांच्या फाइल्स आणि फील्ड नोट्सच्या माध्यमातून सांगितले गेले आहे. यासोबतच आयरीन वेंकट यांचा कथेचा प्रवास सुरू आहे, जिची भूमिका कल्की कोचलिनने साकारली आहे. ती एक लेखिका आणि पत्रकार आहे जिला सुरुवातीला खात्री नसते परंतु 32 व्या वर्षी गौरवच्या अचानक निधनानंतर ती त्यांच्या जगात ओढली जाते. ती त्यांच्या शेवटच्या कार्यांचा पुन्हा तपास करताना आणि गौरव तिवारी व त्यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहून त्यांच्याकडून राहिलेले शोध पुन्हा पाहत असताना, मिथ्यांमागे असलेल्या माणसाबद्दलच्या खऱ्या सत्याची आणि आता त्याला परिभाषित करणाऱ्या वारशाची झलक ट्रेलर मधून दिसून येते.
या मालिकेबद्दल बोलताना, अमोघ दुसाड, संचालक आणि कंटेंट प्रमुख, अॅमेझॉन एमएक्स प्लेअर, म्हणाले, “अॅमेझॉन एमएक्स प्लेअर येथे आम्ही सतत आमच्या कंटेंट स्ट्रॅटेजीचा विकास करीत आहोत जेणेकरून डिजिटल कथाकथन स्वतः कसे वाढत आहे याचे प्रतिबिंब दाखविता येईल. भय – द गौरव तिवारी मिस्ट्री ही सखोल संशोधन केलेली मालिका आहे आणि वास्तविक अनुभवांनी त्यास प्रेरणा लाभली असून हॉरर-मिस्ट्री प्रकारात आमचा प्रवेश दर्शवित आहे. अलौकिक गोष्टी, भय आणि आत्मकथात्मक कथन यांच्या विलक्षण मिश्रणामुळे हे डिजिटल क्षेत्रात खरोखरच एक अनोखी देणगी बनत आहे. या मालिकेतून आमच्या कल्पक मर्यादा वाढविण्याच्या, परंपरांना आव्हान देण्याच्या आणि आश्चर्यचकित करणाऱ्या आणि अर्थपूर्ण कथा सादर करण्याच्या आमच्या श्रद्धेचे प्रदर्शन केले गेले आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर ही धाडसी, भावनिक स्तरांनी समृद्ध रोमांचक कथा सादर करीत आहोत.”भय – द गौरव तिवारी मिस्ट्री दिनांक 12 डिसेंबरपासून फक्त अॅमेझॉन एमएक्स प्लेअर वर प्रीमियर होणार असून एमएक्स प्लेअर अॅप, अॅमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही आणि एअरटेल एक्सस्ट्रीम वर मोफत स्ट्रीम केले जाणार आहे.
‘अचानक कोसळला अन्…’ लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान Mohit Chauhan चा व्हिडीओ चर्चेत; गायकाचे चाहते चिंतेत






