फोटो सौजन्य- pinterest
श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत. या ग्रंथाचे पारायण नऊ दिवसांत पूर्ण करावे. काही साधक या पद्धतीने पारायण न करता रोज 5 ते 100 ओव्या वाचतात. काहीजण रोज एक अध्याय वाचतात. तर काही जण ठराविकच एक अध्याय रोज वाचतात, कारण यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्य फलप्राप्तीसाठी आहे. पूर्ण श्रद्धेने व भक्तीभावाने, तसेच नाथांना शरण जाऊन केलेले पारायणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात. शक्यतो पारायण करण्यासाठी गुरुवार व शुक्रवार हे शुभ दिवस मानले जातात.
‘श्री नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, सुपाऱ्या, नैवेद्यासाठी पेढे इ. तसेच अष्टगंध, अत्तर, रांगोळी, नारळ इ. गोष्टी तयार ठेवाव्यात. नंतर शुद्धोदकाने स्नान करून भस्मलेपन करावे. कलश स्थापन करावा. देवापुढे विड्याची पाने, सुपारी व दक्षिणा ठेवावी, तसेच नयनमनोहर सुंदर रांगोळी काढावी, समई लावावी. नंतर कलशाची पूजा करून पुरुषांनी शक्य असल्यास संध्या करून 108 वेळा गायत्री मंत्रांचा जप करावा.
हा नाथ संप्रदायातील नऊ नाथांच्या चमत्कारीक आणि प्रेरणादायी कथांचा संग्रह असलेला एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ प्रामुख्याने धुंडीसुत श्री मालू कवी यांनी 1819 च्या सुमारास रचलेल्या ‘श्री नवनाथ भक्तिसार’ या मूळ ग्रंथाचे संक्षिप्त रूप किंवा कथा स्वरूपातील सारांश मानला जातो.
या ग्रंथामध्ये एकूण 40 अध्याय आहेत. यामध्ये नऊ नारायणांनी कलियुगात मानव कल्याणासाठी घेतलेले अवतार म्हणजेच ‘नवनाथ’ आणि त्यांच्या अलौकिक कार्याचे वर्णन यात करण्यात आले आहेत. भगवान दत्तात्रेयांनी स्थापन केलेल्या या परंपरेत मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, भर्त्रीनाथ, रेवणनाथ, चरपतीनाथ आणि नागनाथ या नऊ नाथांच्या जन्मापासून ते त्यांच्या सिद्धीपर्यंतच्या कथा आहेत. ग्रंथाच्या 40 व्या अध्यायात त्यातील प्रत्येक आध्याय कोणत्या कार्यासाठी वाचावा याची माहिती दिलेली आहे.
‘श्री नवनाथ भक्तिसार’ ग्रंथाचे पारायण स्त्रियांनी करावे का? असा प्रश्न पुष्कळदा भक्तांच्या मनात येतो. याचे कारण, श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ स्त्रियांनी वाचू नये अशी स्पष्ट आज्ञा प्रसिद्ध दत्तावतार श्रीवासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबेस्वामी महाराज यांनी आपल्या ‘स्त्रीशिक्षा’ या ग्रंथात दिली आहे. याचे कारण या ग्रंथात वेदाक्षरे आलेली आहेत, असे ते सांगतात. परंतु ‘श्रीनवनाथ भक्तिसार’ या ग्रंथात कुठेही वेदाक्षरे नसल्यामुळे हा ग्रंथ पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही वाचण्यास काहीच हरकत नाही. त्यायोगे त्यांचा निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
‘श्रीगुरुचरित्र’ किंवा ‘श्रीनवनाथ भक्तिसार’ अशासारख्या ग्रंथांची भक्तिभावाने पारायणे करणाऱ्या भक्तांना काही वेळा अनेक दिव्य अनुभव आलेली आहेत, असे भाविकांचे मत आहे. यामध्ये नवनाथांचे किंवा एखाद्या नाथांचे दर्शन होणे, त्यांच्याकडून काही संदेश मिळणे किंवा पारायण काही विशिष्य हेतूने केलेले असेल तर त्यासंदर्भात काही सूचना मिळणे, याचप्रमाणे वृत्ती पूर्ण आनंदमय होणे, सुवास येणे, स्वर्गीय नाद ऐकू येणे इथपासून ‘आदेश’ किंवा ‘अलख्’यासारखे शब्द ऐकू येणे. तसेच धंद्यात वृद्धी होते, विवाह इच्छुकांचे विवाह जुळतात, असे अनुभव येतात. या ग्रंथांच्या पाचव्या अध्यायाचे घरात नित्य पठण केल्यास घरातील बाधा किंवा पिशाच्चपीडा दूर होते, असे सांगितले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: नवनाथ कथासार हा नाथ संप्रदायातील नऊ नाथांच्या चमत्कारीक व प्रेरणादायी कथांचा संग्रह असलेला पवित्र ग्रंथ मानला जातो. या कथा भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन देतात.
Ans: पारायण करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजा साहित्य जसे फुले, तुळस, धूप, उदबत्ती, नैवेद्य, कलश इत्यादी तयार ठेवून देवाची पूजा करून पारायण सुरू करावे.
Ans: भक्तांच्या श्रद्धेनुसार या पारायणामुळे मानसिक शांती, आध्यात्मिक उन्नती, अडचणींमधून मार्ग मिळणे आणि इच्छित फलप्राप्ती होण्यास मदत होते.






