(फोटो सौजन्य - x अकाउंट)
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहरचा ‘द ट्रेटर्स’ हा रिॲलिटी शो ओटीटीवर सुपरहिट ठरला आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणाऱ्या या नवीन फॉरमॅट शोला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. करण जोहरच्या या रिॲलिटी शोमध्ये टीव्ही आणि सोशल मीडियातील अनेक प्रसिद्ध स्टार्स स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. आता या रोमांचक प्रवासाचा ग्रँड फिनाले ओटीटीवर प्रसारित झाला आहे. फॅशन आयकॉन आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि निकिता लूथर यांनी ‘द ट्रेटर्स’चा पहिला सीझन जिंकला आहे.
उर्फी जावेद आणि निकिता लूथर यांनी ‘द ट्रेटर्स’चा पहिला सीझन जिंकून ‘द ट्रेटर्स’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली आहे. तसेच उर्फी जावेदच्या चाहत्यांना याचा आनंद झाला आहे. तर सोशल मीडियावर काही नेटकरी संतापले आहेत. उर्फीला तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अश्लील मेसेजेस करून तिला ट्रोल करत आहेत. उर्फी जावेदने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे काही मेसेजेस सोशल मीडियावर शेअर करून पोस्ट केली आहे.
उर्फीने ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा आपल्याला एखाद्या मुलीने केलेले काही आवडत नाही, तेव्हा फक्त ‘R’ हा शब्द वापरून सोडून द्या. मला अशा प्रकारची धमकी किंवा गैरवापर पहिल्यांदाच झाला नाही पण यावेळी ते माझ्या कपड्यांमुळे नाही तर मी शो जिंकल्यामुळे आहे. कल्पना करा की तुम्ही इतके क्षुद्र आहात की जेव्हा तुमचा आवडता खेळाडू जिंकत नाही तेव्हा तुम्ही शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात करता.’
उर्फी पुढे म्हणाली, ‘हे मी शेअर केलेले सर्वात चांगले व्हिडिओ आणि फोटो आहेत. मी काहीही केले तरी लोकांना फक्त द्वेष करणे आणि गैरवापर करणे आवडते. हर्षला बाहेर काढले नसते तर प्रेमात वेडी, हर्षला काढून टाकले असते तर गद्दार. पुरवला जिंकू दिले असते तर मूर्ख आणि नाही दिले असते तर चीटर.’ तुम्ही माझा द्वेष केल्याने मी आधी कधीही थांबवले नाही, आणि आताही कधीही थांबवणार नाही.’ असे लिहून उर्फीने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे.
ट्रेटर्सचा केला पर्दाफाश
शोच्या शेवटच्या टप्प्यात, उर्फी आणि निकिता ‘ट्रेटर्स’ म्हणजेच त्यांच्यामध्ये लपलेल्या ट्रेटर्सचा पर्दाफाश करण्यात आणि त्यांना पराभूत करण्यात यशस्वी झाल्या, त्यानंतर त्या ट्रेटर्सना शोमधून त्यांना बाहेर काढण्यात आले. दोन्ही अंतिम स्पर्धकांनी अनेक आठवडे फसवणुकीच्या या मनोरंजक खेळात स्वतःला सुरक्षित ठेवले आणि शेवटी विजेतेपद जिंकले. ‘द ट्रेटर्स’च्या या दोन्ही विजेत्यांना निर्मात्यांनी १ कोटी रुपयांची मोठी बक्षीस रक्कम दिली आहे.
दुसरा सीझन लवकरच सुरू होईल
करण जोहरच्या या पहिल्या सीझनच्या शानदार समाप्तीनंतर लगेचच, प्रेक्षकांनी त्याच्या दुसऱ्या सीझनची चर्चा सुरू केली आहे. शोची अनोखी संकल्पना आणि त्यात दिसणारा रोमांचक गेमप्लेने प्रेक्षकांच्या खोलवर छाप सोडली आहे, ज्यामुळे ते पुढील सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.