(फोटो सौजन्य - x अकाउंट)
अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला या अभिनेत्रीचे २७ जून रोजी मुंबईत निधन झाले. आता तिचा पती पराग त्यागी यांनी तिच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. शेफाली जरीवालाच्या आठवणीत फोटो शेअर करताना पराग त्यागीने लिहिले की, तो नेहमीच त्याच्या पत्नीवर प्रेम करत राहील. त्यांनी असेही म्हटले की लोकांनी या दोघांना नेहमीच प्रेम पसरवणारी लोकं म्हणून लक्षात ठेवावे अशी त्यांची इच्छा आहे. पराग ही पोस्ट पाहून चाहते देखील पुन्हा भावुक झाले आहेत. बॉलीवूड इंडस्ट्रीसोबत अनेक चाहत्यांना शेफाली जाण्याचा मोठा धक्का बसला आहे.
शेफाली एका उद्देशाने आयुष्य जगली
आपल्या पत्नीची आठवण काढत पराग त्यागीने पुढे लिहिले की, ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी शेफाली, ती दिसण्यापेक्षा खूपच जास्त सुंदर होती. ती एक मंद गतीची मुलगी होती. ती एक अशी स्त्री होती जी तिचे आयुष्य एका उद्देशाने जगली. ती तिचे मन, तिचे शरीर आणि तिचा आत्मा एका उद्देशाने जोपासत असतं. सर्व पदव्या आणि कामगिरीच्या पलीकडे, शेफाली प्रेमाचे सर्वात निस्वार्थी रूप होते.’ असे परागने लिहिले.
शेफाली ही सर्वांच्या पाठीशी उभी राहणारी महिला होती
पराग पुढे म्हणाला की, ‘ती सर्वांची आई होती, नेहमीच सर्वांना प्राधान्य देत असे. तिने तिच्या उपस्थितीने लोकांना सांत्वन दिले. ती एक उदार मुलगी होती. एक समर्पित पत्नी आणि एक अद्भुत आई होती. ती एक चांगली बहीण, चांगली मैत्रीण होती जी तिच्या प्रियजनांच्या पाठीशी नेहमीच उभी राहिली.’ शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या कारणावरून सुरू असलेल्या वादविवादाच्या दरम्यान, पराग म्हणाला की तो या अटकळींमुळे नाराज आहे.
शेफालीचे कौतुक करताना परागने लिहिले, ‘शेफालीला तिने केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी लक्षात ठेवले पाहिजे. तिने लोकांना चांगले वाटले. तिने जीवन उन्नत केले. तिच्यासारख्या तेजस्वी प्रतिमेला कधीही विसरता येणार नाही. मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करेल.’ असे लिहून परागने आपले मन मोकळे केले आहे.
Hina Khan चे दुखावले मन, कॅन्सरमुळे झाले मोठे नुकसान; म्हणाली ‘कष्टाने कमावलेले पैसे…’
शेफालीचा मृत्यू २७ जून रोजी झाला
शेफाली जरीवाला या अभिनेत्रीचे निधन २७ जून रोजी झाला. मुंबई पोलिस अजूनही तिचा मृत्यू कसा झाला याचा तपास करत आहेत. तिच्या अपार्टमेंटमधून वृद्धत्वविरोधी औषध आणि व्हिटॅमिन गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला असे वृत्त होते की शेफाली जरीवाला यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. परंतु अभिनेत्रीच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेला नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे खरे कारण कळेल.