देशभरातील अनेकआता बातमी अशी आहे की अक्षय कुमारच्या वेलकम टू द जंगल या चित्रपटाचा सेट पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, त्यामुळे शूटिंग थांबवण्यात आले आहे. राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ सदृश परिस्थिती असून त्यामुळे लोकांचे मोठे नुकसान होत आहे. केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर मुंबईतही मुसळधार पावसामुळे अनेक उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अक्षय कुमारचा या वर्षातील तिसरा चित्रपट ‘खेल खेल’ प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत दोन सिनेमे पडद्यावर रिलीज झाले आहेत, मात्र हे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहात फ्लॉप ठरले. अशा परिस्थितीत चाहत्यांना या अभिनेत्याकडून आणखी अपेक्षा वाढली आहे. दुसरीकडे, अभिनेता ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, पावसामुळे काही काळ शूटिंग थांबवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
चित्रपटाचा सेट झाला उद्ध्वस्त
वेलकम टू द जंगलचे शूटिंग गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत सुरू आहे. निर्मात्यांनी येथे आलिशान सेट तयार करून ठेवले होते. जो आता मुंबईतील मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झाला आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, ऑगस्टच्या सुरुवातीला निर्मात्यांनी एक भव्य सेट तयार केला होता, परंतु मुंबईत सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ‘वेलकम टू द जंगल’च्या सेटचे नुकसान झालेलं दिसून आले आहे.
Absolute madness of masti begins as we start the shoot of #WelcomeToTheJungle. Will need your wishes for this rollercoaster full of all things fun and crazy 🙂#Welcome3 pic.twitter.com/s8hlvSdhNj
— Akshay Kumar (@akshaykumar) December 13, 2023
हे देखील वाचा- विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधान मोदीसुद्धा ॲक्शनमध्ये; पीटी उषांबरोबर केली चर्चा
शूटिंग कधी सुरू होईल ते जाणून घ्या
रिपोर्टनुसार, चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अहमद सांगतात, “मुंबईत मुसळधार पावसामुळे सेटचा काही भाग खराब होणे दुर्दैवी आहे. अशा परिस्थितीत जोपर्यंत सेटची पुनर्बांधणी होत नाही तोपर्यंत शूटिंग सुरू करणार नाही, असा निर्णय मी घेतला आहे.’ असे त्यांनी सांगितले आहे. म्हणजेच आता जो पर्येंत मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी दिसून येणार नाही तो पर्येंत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.