फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉस 18 ची प्रेक्षकांमध्ये क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या आठवड्यामध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बिग बॉसची चर्चा झाली आणि प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झाले. या आठवड्यामध्ये टीआरपी देखील वाढला आहे त्यामुळे प्रेक्षक आता विकेंडच्या वॉरला काय घडणार यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. यावेळी एकच नाही तर घरातील अनेक सदस्य सलमान खानच्या निशाण्यावर असणार आहेत. सलमानच्या रागाचा बळी ठरलेल्यांमध्ये घराची नवीन टाइम गॉड ईशा सिंहचे नावही सामील आहे. टाइम गॉड बनण्यासाठी तिने करणवीर मेहरासोबत केलेल्या खराब वर्तनासाठी सलमान ईशाची वर्गवारी करेल असे वक्तव्य केले आहे.
वीकेंड का वारमध्ये सलमान खानने करणवीर मेहराच्या शब्दाचा विपर्यास केल्याबद्दल ईशा सिंगला फटकारले. इतकंच नाही तर अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांच्यासमोर तिने करणला आपल्या जवळ येण्यासाठी चुकीच्या पद्धतीने त्यांना सांगितले. भागामध्ये दाखवण्यात आले आहे यामध्ये ती म्हणाली की, तो तिला म्हणाला की मी तुझ्या बाजूला येऊन चिप वागेल. सलमानने सांगितले की, जेव्हा तू करणला तुझ्या शेजारी बसायला बोलावत होतीस तेव्हा तू त्याला पहिले बोलावलेस त्याने नाही. या व्हिडिओमध्ये तू त्याला चिप म्हणत आहेस परंतु आम्हाला खूप वेगळे दिसत आहे.
बिग बॉस 18 संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
वास्तविक २६ नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये टाईम गॉडच्या निवडणुकीचे टास्क सुरू होता यामध्ये अनेक खेळाडूंमध्ये वादावादी सुरु होती. या टास्कदरम्यान ईशा सिंहने करण हे दोघे एकमेकांच्या समोर लांब लांब बसलेले असतात. यावेळी इशा सिंह करणवीरला ‘ये, माझ्याजवळ बस’ असे म्हणत चिथावणी देण्यास सुरुवात केली. यावर करण वीर म्हणाला की तो आला तर ती घाबरेल आणि मग ती त्याला ‘स्वस्त माणूस, स्वस्त माणूस’ म्हणेल. यावर ईशाने करण वीरला सांगितले की, तू तसाही स्वस्त आहेस. करण ईशाला वारंवार असे करू नकोस असे सांगत होता. यानंतर ईशाने तीच गोष्ट अविनाश आणि रजत दलाल यांच्यासमोर वेगळ्या पद्धतीने मांडली. या प्रकरणावर सलमानने तिला खडसावले आहे.
आगामी भागामध्ये सलमान खान शिल्पा शिरोडकर आणि करणवीर मेहरा यांच्या नात्यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करताना दिसणार आहे. यामध्ये आता सलमान खान त्या दोघांची शाळा घेताना दिसेल. त्याचबरोबर या विकेंडच्या वॉरमध्ये रॅपर रफ्तार आणि इक्का घरामध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. त्याचबरोबर कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरी सुद्धा घरामध्ये मज्जा करण्यासाठी येतील. त्यामुळे या हा विकेंडचा वॉर अधिकच मनोरंजक होत चालला आहे.