फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विवियन डिसेना : देशामध्ये चर्चेत असलेला रिऍलिटी शो बिग बॉस १८ सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. घरामध्ये आता सध्या १४ स्पर्धक शिल्लक आहेत. यामध्ये बिग बॉसच्या सहाव्या आठवड्यामध्ये सात स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. मागील आठवड्यामध्ये अरफीन खानचा घरातून प्रवास संपला आहे. त्याच वेळी, शोमध्ये नवीन टाइम गॉडबद्दल युद्ध सुरू आहे. ही सत्ता मिळवण्यासाठी रजत दलाल, शिल्पा शिरोडकर आणि चाहत पांडे यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार आहे. आता या तिघांपैकी टाईम गॉड कोण होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. याआधी, विवियन डिसेना सुमारे दोन आठवडे घराचा टाईम गॉड होता. अशा परिस्थितीत त्याला ‘लाडला’ का म्हणतात, हे विवियनने सांगितले. यामध्ये त्याने सिद्धार्थ शुक्ला यांचे नावही घेतले त्यामुळे सोशल मीडियावर आता बिग बॉसचे प्रेक्षक ट्रॉल करत आहेत.
बिग बॉस 18 संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बिग बॉस 18 मधील पहिल्या दिवसापासून विवियन डिसेनाला शोचा ‘लाडला’ म्हटले जात आहे. त्याचबरोबर त्याला अनेक पॉवर सुद्धा बिग बॉसने दिल्या होत्या. बिग बॉस विवियन डिसेना हा कलर्सचा फेस असल्यामुळे पक्षपात करत आहेत असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. अशातच त्याने विवियनला ‘लाडला’ म्हणण्याचे कारण स्वतः अभिनेत्याने सांगितले. शोच्या एपिसोडची एक क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये विवियन ॲलिस कौशिकशी बोलताना दिसत आहे. यादरम्यान विवियन म्हणतो, ‘मला माहित आहे हे लोक लाडला का म्हणतात, कारण मी एकटाच अभिनेता आहे… खरं तर दोघे, एक तर निघून गेला. आम्ही दोघेच चॅनलसमोर बसायचो आणि बरोबर राईट म्हणायचे. आणि चूक म्हणून चूक हे स्पष्ट करायचो’ हे सांगताना विवियन खूपच भावूक दिसत होता.
या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर प्रचंड गोंधळ उडाला आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओ आणि फोटो शेअर करून सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. विवियन डिसेना बिग बॉसच्या घरामध्ये बसून सिद्धार्थ शुक्लाच्या संदर्भात बोलून पब्लिसिटी स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.
PR Tactic 2: Misread the Tweet and Use old photo. https://t.co/uyyJImOuxW
— BATMAN (@TheBatmanSaidSo) November 14, 2024
I Don’t Support Vivian And Requested To All #VivianDsena Fans Don’t Compre This Man To Sid
Siddharth Shukla was only one and will remain only one. He was the king of Bigg Boss. Sid will always remain in everyone’s heart#SidharthShukIa #SidHearts #GOAT#RajatDalal pic.twitter.com/s3N4mxYwiB
— NIKHIL (@theviralclipsss) November 15, 2024
सध्या, घरातील लोक विवियन डिसेना, फिटनेस प्रभावशाली रजत दलाल, खतरों के खिलाडी 14 चा विजेता करण वीर मेहरा, अरुणाचल प्रदेशची चुम दरंग, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, श्रुतिका अर्जुन, भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा, एलिस कौशिक, आय. सिंग बाकी आहेत. तर, अलीकडेच, स्प्लिट्सव्हिला 15 चे दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर यांनी वाईल्ड कार्ड म्हणून शोमध्ये प्रवेश केला आहे.