 
        
        (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
“बिग बॉस १९” हा वादग्रस्त रिअॅलिटी शो सुरुवातीपासूनच चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. चाहते या शोचा पुरेपूर आनंद घेत आहेत आणि त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना पाठिंबा देत आहेत. नवीन भागात अनेक मजेदार क्षण दाखवण्यात आले आहेत, ज्यात तान्या मित्तलने मालती चहरच्या बॉक्समधून झीशान कादरीचा स्वेटर काढून तो घातला आहे. यामुळे घरातील सदस्यांमध्ये गोंधळ उडाला, अनेकांना प्रश्न पडला की हा स्वेटर अमलचा आहे की झीशानचा.
हा प्रसंग पाहून घरातील इतर सदस्य हसण्यावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. अनेक लोक आता चर्चा करत आहेत की, तो स्वेटर अमलचा आहे की जीशानचा?
तान्या मित्तलने झीशान कादरीचा स्वेटर घातलेल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. चाहत्यांना सुरुवातीला वाटले होते की तो अमाल मलिकचे आहे आणि म्हणूनच तान्याने तो घातला होता, मालतीकडून तो हिसकावून घेतला होतो.तर आता झीशानने आता क्लिपवर प्रतिक्रिया दिली आहे आणि पुष्टी केली आहे की तो त्याचा स्वेटर आहे. चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये शेअर केल्या आहेत.
झीशानचा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला. एका वापरकर्त्याने लिहिले, “झीशान भाईला त्याचा स्वेटर परत हवा आहे, नाटक नाही!” दुसऱ्याने म्हटले, “तान्याने स्वेटरचा लूक जबरदस्त दाखवला, पण बिचारा झीशानला तो परत हवा आहे.” एका चाहत्याने गंमतीने म्हटले, “त्या स्वेटरने संपूर्ण सीझनपेक्षा जास्त नाटक पाहिले आहे!” तर काहींनी झीशानचे कौतुक केले आहे.
Aare woh mera sweater hai @itanyamittal @ChaharMalti 🤣 Wapas kardo please😝#ZeishanQuadri #BiggBoss19 #TanyaMittal #AmaalMallik #MaltiChahar @JioHotstar @BiggBoss pic.twitter.com/qqTVGfqDrq — Zeishan Quadri (@TheOGZeishan) October 31, 2025
‘मी तुरूगांत गेले असते तर…’ कॅमेऱ्यासमोर Rakhi Sawant ढसाढसा रडली, ड्रामा क्विनला झाले तरी काय?
झीशान कादरीला आधीच रिअॅलिटी शोमधून बाहेर काढण्यात आले आहे, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. अलीकडेच नेहल चुडासमा आणि बसीर अली यांनीही शो सोडला. आता या आठवड्यात कोणाला बाहेर काढले जाईल हे पाहायचे आहे.






