 
        
        (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
राखी सावंत सोशल मीडीवर गेल्या काही आठवड्यांपासून सतत चर्चेत आहे आणि सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक कृतीमुळे गदारोळ माजलाय. काही दिवसांपूर्वीच राखी सावंतचे एक गाणं रिलीज झालं होते. त्यानंतर तिचा तान्या मित्तलला चिडवत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
आता ड्रामा क्विन पुन्हा एकदा तिच्या वागण्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या डोळ्यांतील अश्रूंमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने मीडियाशी संवाद साधताना आपलं मन मोकळं केलं आणि तिच्या पर्सनल लाईफबद्दल स्पष्टपणे बोली.
यावेळी राखी म्हणाली, “मी प्रेमात पडले नसते तर बरे झाले असते. लग्न झाले नसते तर बरे झाले असते.माझे सगळे पैसे गेले, माझं सगळं काही संपलं. सॉरी, मी रडतेय… मी लोकांना हसवणारी मुलगी होते. पण काही हरकत नाही, मी पुन्हा सगळं मिळवेन. ते सगळं विसरून जा, माझी नवीन बॅग बघा… माझ्याकडे असलेली सर्वात महागडी बॅग…”
रडत-रडतच तिने पुढे पत्रकारांना सांगितलं, “ते सगळं सोडा, हे बघा माझं नवीन बॅग… माझ्याकडे सगळ्यात महागडी बॅग आहे!”
राखी सावंतच्या या भावनिक पण नाट्यमय प्रतिक्रिया पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
राखी सावंत पुढे म्हणाली, “मी साडेतीन कोटी रुपये घेतले… मी भारतात येण्यासाठी सर्वस्व सोडले. माझ्या आईच्या स्मशानभूमीला भेट देण्यासाठी मी सर्व केसेस मागे घेतल्या. मला माझ्या आईला भेटायचे होते; पैसे कधीही कमवता येतात. मला आनंद आहे की मला पुन्हा भारतात येण्याची संधी मिळाली. हे माझे कामाचे ठिकाण आहे. दुबईमध्ये मला खूप आश्रय मिळाला आहे. जेव्हा माझे गर्भाशयाचे ऑपरेशन झाले तेव्हा पोलिसांना मला अटक करायची होती.”
कपूर कुटुंबावरील डॉक्युमेंट्रीची रिलीज डेट जाहीर, नेटफ्लिक्स शोमधून आलिया भट्ट गायब?
राखी सावंत म्हणाली, “माझा जामीन रद्द झाला. ती कारवाई होताच मला पळून जावे लागले. जर मी देश सोडला नसता तर पोलिसांनी मला त्या अवस्थेत तुरुंगात नेले असते. मी खूप काही सहन केले आहे. कृपया मला हे सर्व पुन्हा आठवण करून देऊ नका.” राखी सावंतचे हे विधान आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोक तिची खिल्ली उडवत आहेत. लोक म्हणत आहेत की अशी विधाने करत असतानाही राखी सावंत कधीही लोकांना हसवण्याची संधी सोडत नाही.






