करीना कपूर (kareena kapoor), तब्बू (tabu) आणि क्रिती सेनॉनचा (kriti sanon) चित्रपट क्रू बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच धुमाकूळ घालत आहे. Sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं पहिल्या दिवशी ९.२५ कोटींची कमाई केली होती. आता चित्रपट रिलीज होण्याच्या सहाव्या दिवशी 3.3 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट जगभरात एक मैलाचा दगड गाठणार आहे, कारण ‘क्रू’ 100 कोटी क्लबच्या जवळ आला आहे. ‘क्रू’च्या निर्मात्यांनी सहाव्या दिवशी चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनचा (Crew Worldwide Collection) अहवाल शेअर केला आहे.
‘द क्रू’चा जागतिक बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. ताज्या आकडेवारीनुसार, या चित्रपटानं जगभरात 77.33 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. येत्या वीकेंडमध्ये ‘क्रू’च्या व्यवसायाचा वेग आणखी वाढू शकतो आणि हा चित्रपट जगभरातील १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. ‘क्रू’ हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. तरीही, ॲक्शन चित्रपटांच्या ट्रेंडमध्ये ते आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचं दिसत आहे.
क्रू चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केले आहे.क्रूच्या कथेबद्दल सांगायचं तर, ती तीन महिलांच्या कथेवर आणि एअरलाइन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. मात्र, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी तिन्ही एअर होस्टेस चुकीच्या गोष्टी करतात आणि अडकतात, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ते एकामागून एक चुकीच्या गोष्टीत अडकत जातात. यामध्ये करीना, तब्बू आणि क्रिती यांनी कॉमेडीसोबतच ग्लॅमरही जोडले आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन खूपच कमकुवत असल्याचे समीक्षकांचे मत असले तरी या तिन्ही अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने चित्रपट मजबूत केला आहे.