काही दिवसांपूर्वीच “श्रीदेवी प्रसन्न” या चित्रपटाचा एक भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. सोशल मीडियावर झळकलेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. आता या चित्रपटातील पहिलं वहिलं भन्नाट गाणं प्रदर्शित झालं आहे, यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘देखा जो तुझे यार’, (shridevi prasanna song) असे त्याचे बोल असून हे टिप्सचंच गाणं वेगळ्या ढंगात सादर करण्यात आलं आहे. यामध्ये सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Sidhharth Chandekar) यांची केमेस्ट्रीने प्रेक्षकांना चांगलच वेड लावलं आहे.
[read_also content=”रामभक्तांसाठी आंनदाची बातमी, PVR INOX मध्ये राम मंदिर उद्घाटनाचं थेट प्रक्षेपण पाहा 100 रुपयांत; सोबत शितपेयाचा देखील आनंद घ्या! https://www.navarashtra.com/movies/ram-mandir-inauguration-live-streaming-in-pvr-iand-inox-multiplex-nrps-499914.html”]
“श्रीदेवी प्रसन्न” या सिनेमातून टिप्सने आता मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. सिनेमावेड्या फॅमिलीज ही ह्या सिनेमाची एक थीम आहे आणि म्हणूनच काही हिंदी गाणी हटके पद्धतीने ह्या चित्रपटाचा भाग बनली आहेत. याच्या टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या रिस्पॉन्सने बोल्ड ब्युटीफुल सई व चॉकलेट बॉय सिद्धार्थ ह्यांच्या फिल्म साठी लोक किती उत्सूक आहेत ते सिद्ध केलं आहेच. येत्या २ फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
“श्रीदेवी प्रसन्न, या फ्रेश चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विमल मोढवे आणि लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करता येईल अशी लोकांपर्यंत आणावी हाच ह्या चित्रपटामागचा थॉट आहे. ही इंटरेस्टिंग गोष्ट नव्या अप्रोच ने प्रेक्षकांसमोर आणण्यात क्रीएटिव्ह प्रोड्युसर्स नेहा शिंदे आणि अविनाश चाटे ह्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, रमाकांत दायमा ह्यांच्या सारख्या मातब्बर कलाकारांसोबत सिनेमात सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, राहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे तरुण कलाकार देखील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. कुमार तौरानी,व टिप्स फिल्मस लि. हे मराठी चित्रपट सृष्टीतल्या आपल्या एंट्री बद्दल होपफ़ुल आहेत. श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या माध्यमातून फील गुड, एन्टरटेनिंग, रोमँटिक कॉमेडी ते पडद्यावर आणत आहेत. ह्या सिनेमाच्या निमित्ताने सुरु झालेला टिप्स सिनेमाचा प्रवास मराठी प्रेक्षकांच्या सोबत पुढेही सुरु राहील ह्याची त्यांना आशा आहे.






