Deepika Chikhalia Birthday She Played Roll In B Grade Movie Before Ramayana Serial
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ लोकप्रिय मालिकेतून सीता ही भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलीया यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. दीपिका यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेऊया…
रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतून दीपिका घराघरात प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. या मालिकेपासूनच चाहते त्यांना देव मानू लागले होते. पण जेव्हा त्यांनी बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले तेव्हा मात्र प्रेक्षक चांगलेच नाराज झाले होते. इंडस्ट्रीत आपले करिअर घडवण्यासाठी त्यांनी बी ग्रेड चित्रपटांचा आधार घेतला होता. जाणून घेऊया दीपिका चिखलियाबद्दलच्या काही रंजक गोष्टी…
ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान ‘बिग बॉस १६’ फेम अभिनेत्याने घेतली अलिशान कार, किंमत वाचून डोळे विस्फारतील
‘रामायण’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. त्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर उमटवलेला ठसा आजही पुसला गेलेला नाही. या ‘रामायण’ मालिकेतील राम-लक्ष्मण-सीता यांना लोक प्रत्यक्षात देवताच मानू लागले होते. मालिकेत सीतेची भूमिका दीपिका चिखलीया यांनी साकारली होती. या अभिनेत्यांना देव समजून लोक त्यांच्या पाया पडत असत. पण तुम्हाला माहितीये का, मालिकेतल्या सीतेसाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांनी याआधी आणि नंतरही अनेक मालिकांत काम केलं, पण त्या प्रामुख्यानं रामायण मधील सीतेच्या भूमिकेसाठीच त्या ओळखल्या जातात. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ‘रामायण’ ही मालिका दीपिका यांना मिळालीये.
सुपरस्टार अंकुश चौधरी बनला गायक, ‘पी.एस.आय. अर्जुन’मधील Promotion song तुम्ही ऐकलंत का ?
२९ एप्रिल १९६५ रोजी जन्मलेल्या दीपिका चिखलिया यांना त्यांच्या बालपणापासूनच मॉडेलिंग आणि अभिनयाची आवड होती. दीपिका यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. दीपिका यांनी 1983 साली राजश्री बॅनरखाली रिलीज झालेल्या ‘सुन मेरी लैला’ या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलंय. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. यानंतर त्यांनी ‘पत्थर’, ‘भगवान दादा’, ‘घर संसार’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र त्यानंतरही त्यांना पदरी अपयशच मिळालं. सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे दीपिका यांना बॉलिवूडमध्ये काम मिळणं कठीण झालं होतं.
‘पंचायत’नंतर आता ‘ग्राम चिकित्सालय’ हटके वेबसीरिज येतेय, कधी आणि कुठे रिलीज होणार ?
त्याचदरम्यान, दीपिका यांना छोट्या पडद्यावरील काही मालिकांमध्येही काम केलं, ज्यामध्ये ‘पेइंग गेस्ट’ आणि ‘विक्रम बेताल’ यांचा समावेश आहे. या मालिका करूनही त्यांना काम मिळणं अवघड झालं होतं. अशा परिस्थितीत त्यांनी आपला मोर्चा बी ग्रेड चित्रपटांकडे वळवला. दीपिका यांनी ‘चीख’ आणि ‘रात के अंधेरे मे’ यांसारख्या अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक बोल्ड सीन्सही दिले. दीपिका दिसायला खूपच सुंदर होत्या, पण काम न मिळाल्याने त्यांना ही तडजोड करावी लागली आणि त्यांनी एकापाठोपाठ एक बी ग्रेड चित्रपटात काम करायला सुरुवात केली. याचदरम्यान करिअर जवळजवळ संपण्याच्या मार्गावर असताना त्यांना ‘विक्रम बेताल’ ही टीव्ही मालिका मिळाली.
पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, “४ आणि ५ मे रोजी…”
‘विक्रम बेताल’ मालिकेची निर्मिती रामानंद सागर यांनी केली होती, त्याचवेळी ते ‘रामायण’वर सुद्धा काम करत होते. रामानंद ‘रामायण’वर काम करत असल्याचे समजताच दीपिकाने मालिकेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण मालिकेमध्ये सीता बनणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. चार- पाच स्क्रीन टेस्टनंतर ‘रामायण’ मालिकेत सीतेच्या पात्रासाठी त्यांची निवड झाली. पण सुरुवातीला प्रेक्षकांना हा निर्णय पटला नव्हता. सीतेच्या भूमिकेसाठी दीपिका यांना खूप विरोध झाला होता. कारण त्यांना प्रेक्षकांनी अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन्स दिलेलं पाहिलं होतं, त्यामुळेच सीतेच्या भूमिकेत अभिनेत्रीला स्वीकारणं प्रेक्षकांना अवघड झालं. पण चांगली गोष्ट म्हणजे हा विरोध मर्यादित होता. कारण याआधी त्यांचे हे चित्रपट अनेकांनी पाहिलेले नव्हते. मग दीपिका यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि सीतेच्या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आजही लोक दीपिका यांना भेटतात तेव्हा माता सीता म्हणत त्यांच्यापुढे हात जोडतात.