विपुल शाह यांचे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पाऊल, "भेड भरम" हॉरर सिरीयरलचा खतरनाक ट्रेलर रिलीज
‘द केरला स्टोरी’ आणि ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ सारख्या चित्रपटांचे निर्माते म्हणून विपुल शाह यांची ओळख आहे. विपुल अमृतलाल शाह यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. कायमच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत राहिलेले विपुल शाह सध्या त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टमुळे चर्चेत आले आहे. खरंतर, ते चित्रपटामुळे नाही तर, मालिकेमुळे चर्चेत आले आहे. “भेड भरम” असं त्यांच्या मालिकेचं नाव असून या सीरियलचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
कायमच क्षमतेच्या पलिकडे विचार करणारे विपुल शाह यांनी आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पाऊल टाकले. विपुल शाह, त्यांचा निर्मिती हाऊस सनशाइन पिक्चर्स आणि भारतातील प्रमुख दूरचित्रवाणी नेटवर्क डीडी नॅशनलद्वारे “भेद भरम” हा महाकाव्य कार्यक्रम सादर करत आहे आणि याचा ट्रेलर लाँच झाला आहे. विपुल अमृतलाल शाह यांचे सनशाइन पिक्चर्स आणि डीडी नॅशनल अनेक दिवसांनंतर “भेद भरम – रहस्यों का मायाजाल” प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो हरकिसन मेहता यांच्या कादंबरीवर आधारित आहे.
Are you ready for a spine-chilling journey? Dive into #BhedBharam – Rahasyon Ka Mayajal where secrets & scares await.
Trailer Out Now#BhedBharamTrailer
Releasing on 18th November on DD National!#VipulAmrutlalShah @Aashin_A_Shah@iyashpalsharma @atulkumartct @Pranavmisshra pic.twitter.com/Jv5JWacKuW
— Sunshine Pictures (@sunshinepicture) November 11, 2024
भेड भरम सह, चित्रपट निर्मात्याने अलौकिक आणि भयपट प्रकारात प्रवेश केला जो सध्या प्रचलित आहे. शोमध्ये प्रमुख भूमिकेत यशपाल शर्मा, अतुल कुमार, गौरव चोप्रा, ऐश्वर्या सखुजा, वैशाली ए. ठक्कर, विशाल मल्होत्रा, प्रणव मिश्रा, दिव्यांगना जैन, वानिकी त्यागी आणि समीर धर्माधिकारी यांच्यासह प्रभावी कलाकार आहेत. भेद भरमचे दिग्दर्शन युसूफ बसराई यांनी केले असून, हरकिसन मेहता यांनी लिहिलेली कथा आहे. या शोची निर्मिती सनशाइन पिक्चर्स लिमिटेड आणि आशिन ए. शाह आणि रविचंद नल्लाप्पा यांनी सह-निर्मिती केली आहे.
हे देखील वाचा- ‘जुबां केसरी’मुळे सिंघमची सटकली, मीम्स- ट्रोलर्सला मुलाखतीतून दिले ‘हे’ उत्तर
याशिवाय विपुल अमृतलाल शाह सनशाइन पिक्चर्स आणि जिओ स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा पुढचा ‘हिसाब’ घेऊन येत आहेत. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विपुल अमृतलाल शाह यांनी केले आहे आणि जयदीप अहलावत आणि शेफाली शाह अभिनीत आशिन ए शाह यांनी सह-निर्मिती केली आहे. हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे.