(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रोहित राऊत पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये हिट गाणी गाऊन लोकप्रियता मिळवलेल्या रोहितने आता स्वतःचा सिंगल म्युझिक व्हिडिओ ‘डीपी झूम करून’ सादर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. ट्रेंडी आणि तरुणाईला भावणाऱ्या शीर्षकामुळे या गाण्याची आधीपासूनच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
या गाण्याचं पोस्टर नुकतंच अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते Mahesh Manjrekar यांच्या हस्ते लाँच करण्यात आलं. पोस्टर लाँच सोहळ्यात रोहितने गाण्याबाबत उत्सुकता वाढवणारी माहिती शेअर केली. ‘डीपी झूम करून’ हे गाणं आजच्या सोशल मीडिया पिढीच्या भावनांना आणि ट्रेंड्सना साजेसं असल्याचं त्याने सांगितलं.
जयंग गंगणे, स्वरूप स्टडिओज प्रस्तुत “डीपी झूम करून” या गाण्याची निर्मिती जयंत गंगणे, सचिन नारकर, विकास पवार यांनी निर्मिती केली आहे. आजवर अनेक मराठी चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती स्वरूप स्टडिओज यांनी केली आहे. राहुल ढेंगळे यांच्या गीताला विकी अ़डसूळे यांनी स्वरसाज चढवला आहे. संतोष भांगरे यांनी नृत्य दिग्दर्शन, नैनेश डिंगणकर यांनी संकलन, जिज्ञासा पेनूरकर यांनी वेशभूषा, अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्मिती केली आहे.
“डीपी झूम करून” या शब्दांना गुलाबाच्या फुलांनी वेढले आहे. तसेच एक तरुण-तरुणी सायकलवर आहेत. गाण्याच्या पोस्टरवरून हे गाणं युथफुल, रोमँटिक असल्याचं जाणवतं. आजवर रोहित राऊतनं अनेक रोमँटिक गाणी गायली आहेत. त्यामुळे डीपी झूम करून हे गाणं रोहितच्या आजवरच्या गाण्यांपेक्षा किती वेगळं ठरतं याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आता लवकरच हे गाणं आपल्या भेटीस येणार आहे.
रोहितच्या या नव्या म्युझिक व्हिडिओकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. गाणं लवकरच प्रदर्शित होणार असून, त्यातील संगीत आणि व्हिज्युअल्स तरुण प्रेक्षकांना खास आकर्षित करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






