(फोटो सौजन्य - x अकाउंट)
बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक साजिद खानबद्दल एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहे. अभिनेत्री म्हणाला की, ‘साजिद खानने मला घरी बोलावले आणि चुकीच्या मागण्या केल्या.’ तो ‘हे बेबी’ चित्रपटासाठी कलाकारांची निवड करत होता. त्याने मलाही बोलावले आणि माझे कपडे काढून अंतर्वस्त्रामध्ये बसण्यास सांगितले. मला बघायचंय की तू किती आरामात आहेस. असं साजिद खान अभिनेत्रीला म्हणाला. दिग्दर्शक साजिद खानवर हा आरोप अभिनेत्री नवीना बोले यांनी केला आहे, तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि ‘सीआयडी’ सारखे शो केले आहेत. आणि आता या धक्कादायक खुलासा नंतर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे.
नवीना बोलेने केला खुलासा
‘इश्कबाज’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री नवीना बोले हिने नुकतेच सुभोजित घोषच्या यूट्यूब चॅनलवर खुलासा केला की साजिद खानने तिला कपडे उतरवण्यास सांगितले होते. ती म्हणाली की, ‘साजिदने मला घरी बोलावले आणि चुकीच्या मागण्या केल्या. हे २००४ ते २००६ दरम्यान घडले. तो ‘हे बेबी’ चित्रपटासाठी कलाकारांची निवड करत होता. त्याचवेळी मी ऑडिशनला गेली होती आणि माझे कपडे काढून अंतर्वस्त्रामध्ये बसण्यास सांगितले.’ असा धक्कादायक खुलासा अभिनेत्रीने या मुलाखतीत केला.
बादशाहच्या नवीन गाण्यावर एफआयआर दाखल, Velvet Flow रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात!
नवीना पुढे म्हणाली, ‘एक वर्षानंतर, साजिद खानने पुन्हा माझ्याशी संपर्क साधला. त्यावेळी मी ‘मिसेस इंडिया’मध्ये सहभागी होत होते. त्याने मला विचारले की मी तुला एखाद्या भूमिकेसाठी भेटायला येऊ शकतो का? कदाचित या माणसाला आठवत नव्हते की त्याने एक वर्षापूर्वी माझ्याशी काय केले होते.’ असं अभिनेत्री म्हणाली.
नवीना बोले आहे तरी कोण?
नवीना बोले ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. ती ‘सीआयडी’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘बालवीर’ आणि ‘इश्कबाज’ यासह अनेक हिट टीव्ही मालिकांचा भाग आहे. याशिवाय तिने ‘हनीमून स्वीट रूम नंबर ९११’ ही वेब सिरीज देखील केली आहे. अभिनेत्रीने स्वतःच्या हिमतीवर टीव्ही विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
साजिद खानवर यापूर्वीही केले गेले होते आरोप
साजिद खानने बॉलिवूडमध्ये अनेक विनोदी चित्रपट बनवले आहेत. तो कोरिओग्राफर फराह खानचा भाऊ देखील आहे. साजिदने ‘हे बेबी’ आणि ‘हाऊसफुल’ सारखे हिट चित्रपट दिले. त्याच्या नावावर आणखी बरेच चित्रपट आहेत. २०१८ मध्ये, अनेक अभिनेत्रींनी साजिदवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. यामध्ये सलोनी चोप्रा, करिश्मा उपाध्याय, सिमरन सुरी, मंदाना करीमी यासारख्या अभिनेत्रींचा समावेश होता.