फोटो सौैजन्य: Farah Khan (YouTube Channel)
बॉलिवूड इंड्रस्टीमध्ये आपल्याला असे अनेक कलाकार भेटतील जे यूट्यूबवर आपल्या चॅनेलमार्फत प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. यातीलच एक उदाहरण म्हणजे फराह खान. फराह खान यांनी काही हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, ज्यात ओम शांती ओम सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
फराह खान आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. पण त्यांच्या व्लॉगमध्ये एक असाही चेहरा आहे जो प्रेक्षकांना नेहमीच आपलासा वाटतो. तो चेहरा म्हणजे फराह खानच्या कूकचा. आणि त्याचे नाव दिलीप ! पण आता दिलीप हा फक्त फराह खान यांचा कूक राहिला नसून त्यांच्या यूट्यूब व्लॉग्समधील एक ओळखीचा आणि आपलासा हिरो झाला आहे.
बॉलिवूडच्या अन्य सेलिब्रेटी मंडळींप्रमाणे फराह खानने देखील आपले यूट्यूब चॅनेल उघडले होते. या चॅनेलवर त्या व्लॉग्स अपलोड करत असतात. कालांतराने त्यांच्या या व्लॉग्सला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळू लागला. आतापर्यंत तिच्या किचनमध्ये अनेक सेलिब्रेटी लोकांनी हजेरी लावली आहे. यामध्ये अभिषेक बच्चन, राखी सावंत, बोनी कपूर, करण जोहर, इत्यादींचा समावेश आहे. पण आज फराह खानचा प्रेक्षक या सेलिब्रेटी लोकांना नाही तर तिचा कूक दिलीपला पाहायला येतात. फराह खानच्या व्लॉग्समध्ये दिलीप फक्त चविष्ट पदार्थच बनवत नाही तर आपल्या मिश्किल स्वभावाने व्हिडिओ अधिक मजेदार आणि विनोदी बनवतो.
आज फराह खानच्या यूट्यूब व्लॉग्समधून दिलीप हा घराघरात पोहोचला आहे. पण तुम्हाला दिलीपची एकूण संपत्ती माहित आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया.
दिलीप हा केवळ एक व्लॉग स्टार नाही. फराहच्या म्हणण्यानुसार, बिहारमध्ये त्याचा तीन मजली बंगला आहे, ज्यामध्ये सहा बेडरूम्स आहेत. याशिवाय, त्याच्याकडे स्वतःची शेतीची जमीन, जनावरे आणि खासगी तलावसुद्धा आहे. दिलीपचा पूर्ण परिवार म्हणजेच आईवडील, पत्नी आणि दोन मुलं तिथेच राहतात. तर दिलीप सध्या आपल्या कामासाठी मुंबईत स्थायिक आहे.
‘मिलिमीटर’ अब सेंटिमीटर हो गया…, पाहा आता कसा दिसतो ‘3 इडियट्स’मधला तो प्रसिद्ध अभिनेता
अलीकडच्या एका एपिसोडमध्ये फराहने दिलीपला विचारलं होतं की दिलीप, पुढच्या वेळेस कोणासोबत शूट करणार? यावर दिलीपने थेट उत्तर दिलं, “शाहरुख खान सरसोबत !” हे ऐकताच फराह आणि करण वाही दोघंही आश्चर्यचकित झाले. इतकंच नाही, तर दिलीपने पुढे सांगितलं की, सेटवर जाण्यासाठी त्याला आता एक नवीन गाडीही हवी आहे.