Freedom At Midnight चा नवा टीझर रिलीज, १९७४ मधील स्वातंत्र्यसंग्राम दिसणार
‘रॉकेट बॉईज’ सिरीजच्या भरघोस यशानंतर निखिल आडवाणींच्या आगामी सीरीजचा टीझर रिलीज झाला आहे. दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्या ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’चा आणखी एक टीझर रिलीज झाला आहे. सोनी लिव्हवर रिलीज होणाऱ्या सीरीजचे कथानक इतिहासाची अनुभूती देणारी आहे. ही वेबसीरीज १५ नोव्हेंबरला स्ट्रीम होईल.
टीझरमध्ये, इतिहासामधील महत्त्वपूर्ण क्षण पाहायला मिळतो. महात्मा गांधी फाळणी रोखण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना आवाहन करतात की त्यांनी मुहम्मद अली जिना यांना नेतृत्व पद द्यावे. ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ ही सीरीज पॉलिटिकल थ्रिलर आहे, १९७४ मधील भारताच्या स्वातंत्र्यासंदर्भातील नाट्यमय व महत्त्वपूर्ण घटनांना सादर करते.
‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ असून, कथा डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांच्या ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ या पुरस्कार-प्राप्त पुस्तकावर आधारित आहे. ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’चा टीझर सोनी लिव्हच्या अधिकृत इंस्टग्राम हँडलवरून शेअर केला गेला आहे. प्रेक्षकांची सिरीजबद्दलची उत्सुकता सोशल मीडियावर दिसून येत आहे. स्टुडिओनेक्स्टसोबत सहयोगाने एम्मी एंटरटेन्मेंट (मोनिषा अडवाणी व मधू भोजवानी)द्वारे निर्मित सिरीज ‘फ्रीडम ॲट मिडनाइट’च्या निर्मितीसाठी प्रतिभावान टीमचा हातभार लागला आहे. या सिरीजचे शोरनर व दिग्दर्शक निखिल अडवाणी आहेत, तर अभिनंदन गुप्ता, अद्वितीय कारेंग दास, गुनदीप कौर, दिव्या निधी शर्मा, रेवंता साराभाई व एथन टेलर यांनी या सिरीजच्या कथानकाचे लेखन केले आहे. लॅरी कॉलिन्स व डॉमिनिक लॅपियर यांच्या प्रख्यात पुस्तकावर आधारित सिरीज ‘फ्रीडम ॲट मिडनाइट’ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधील महत्त्वपूर्ण क्षणांना प्रकाशझोतात आणते.
या सिरीजमध्ये प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत, जसे जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेत सिद्धांत गुप्ता, महात्मा गांधी यांच्या भूमिकेत चिराग वोहरा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत राजेंद्र चावला, मुहम्मद अली जिना यांच्या भूमिकेत आरिफ जाकारिया, फातिमा जिना यांच्या भूमिकेत ईरा दुबे, सरोजिनी नायडू यांच्या भूमिकेत मलिष्का मेंडोन्सा, लियाकत अली खान यांच्या भूमिकेत राजेश कुमार, व्ही. पी. मेनन यांच्या भूमिकेत केसी शंकर, लॉर्ड लुईस माऊंटबॅटन यांच्या भूमिकेत ल्यूक मॅकगिबनी, लेडी एडविना माऊंटबॅटन यांच्या भूमिकेत कॉर्डलिया बुगेजा, आर्चीबाल्ड वेव्हेल यांच्या भूमिकेत ॲलिस्टर फिन्ले, क्लेमेंट ॲटली यांच्या भूमिकेत अँड्र्यू कुलुम, सिरील रॅडक्लिफ यांच्या भूमिकेत रिचर्ड टेव्हरसन आहे.