बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करणारा ‘सिंघम अगेन’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या
दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘सिंगम अगेन’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. अजय देवगण, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, करीना कपूर खान आणि अर्जुन कपूर सारखी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १ नोव्हेंबरला रिलीज झाला असून या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात १२१ कोटींची कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने २०० कोटींच्या आसपासची कमाई तीन दिवसांत केली आहे. बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळत असलेला ‘सिंगम अगेन’ सिनेमा आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार असल्याची माहिती मिळत आहे.
चित्रपट रिलीज होऊन सध्या तीन दिवसच झाले आहेत. तोच चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दलची चर्चा सुरू आहे. दरम्यान, प्रेक्षकांना हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार ? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचे ओटीटी राईट्स ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने विकत घेतले आहेत. चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ४५ दिवसांनंतर ओटीटीवर रिलीज केला जातो. तसं पाहिल्यास ‘सिंघम अगेन’ चित्रपट मग ओटीटीवर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होण्याची शक्यता आहे. अद्याप ‘सिंघम अगेन’च्या ओटीटी रिलीजबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
काश्मीरमध्ये तैनात असलेला बाजीराव सिंघम आणि रामलीलेतून रामायण सादर करणारी त्याची पत्नी अवनीची ही कथा आहे. या चित्रपटाची कथा रामायणाबरोबर पॅरालल आहे. सिंघम अगेन’मध्ये अर्जुन कपूरने लंका नावाची भूमिका केली आहे. तो बाजीराव सिंघमची (अजय देवगण) पत्नी अवनी म्हणजेच करीना कपूर खानचे अपहरण करतो. सिंघमवर हल्ला करण्यासाठी आलेल्या अतिरेकी ओमर हाफिजला सिंघम पकडतो. त्यावेळी ओमर त्याला सांगतो की, कोणीतरी माझ्यापेक्षाही डेंजर असून, तो येणार आहे. दोन वर्षांनी ओमरचा नातू डेंजर लंका अवनीचे अपहरण करून तिला श्रीलंकेमध्ये नेतो. त्यानंतर सिंघम आणि त्याची टीम अवनीला सोडविण्यासाठी कशा पद्धतीने जीवाची बाजी लावते, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळेल.