Govinda-Sunita Divorce: लग्नाच्या 37 वर्षानंतर अभिनेता गोविंदा आणि सुनिता घटस्फोट घेणार? इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल
बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी देखील अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती आणि त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, अशी चर्चा सुरु होती. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची एक इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, आता लग्नाच्या 37 वर्षांनंतर बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांचा घटस्फोट होणार आहे.
रणवीर अल्लाहबादियासह आशिष चंचलानी अडचणीत, महाराष्ट्र सायबर सेलसमोर चौकशीसाठी हजर!
इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या पोस्टनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यासंबंधी अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता त्यांचा खरच घटस्फोट होणार का, याची चर्चा सुरु आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
thenowindia या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, अभिनेता गोविंदा आणि सुनिता आहुजा लग्नाच्या 37 वर्षांनंतर घटस्फोट घेणार आहेत. पोस्ट शेअर करत thenowindia ने म्हटलं आहे की, गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा घटस्फोटाच्या अंतिम टप्प्यात असल्याचे अहवाल सांगत आहेत. असा दावा केला जात आहे की गोविंदाचे कोणत्यातरी मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असून याच प्रकरणी आता घटस्फोटाचा निर्णय घेण्यात आला असावा. कशाचीही पुष्टी झालेली नसली तरी सोशल मीडियावर आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.त्यांच्या अनेक दशकांपासून चाललेल्या वैवाहिक जीवनाचा हा खरोखरच शेवट असू शकतो का?
जानेवारी महिन्यात सुनीता आहुजाची एक मुलाखत व्हायरल झाली होती, ज्यामध्ये तिने म्हटलं होतं की, ती आणि गोविंदा वेगळे राहतात. गोविंदाकडे तिच्यासाठी वेळ नाही. मी त्याला सांगितले होते की मला तो माझ्या पुढच्या आयुष्यात माझा नवरा नको आहे. तो सुट्टीवर जात नाही. मी ती व्यक्ती आहे जिला तिच्या पतीसोबत बाहेर जाऊन रस्त्यावर पाणीपुरी खायची इच्छा असते. तो आपला सगळा वेळ कामात घालवतो. आम्ही एकत्र चित्रपट पाहायला गेलो होतो असा एकही प्रसंग मला आठवत नाही.
‘पारु’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती, आलिशान घरात गृहप्रवेश करतानाचे शेअर केले Photos
सुनीताने दिलेल्या या मुलाखतीनंतर आता गोविंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटाची बातमी खरी आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र अद्याप दोघांनीही याबाबत अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य दिलेलं नाही. त्यामुळे आता सर्वांनाच दोघांच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा आहे.