गुजराती चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'सैराट' कामगिरी!
सध्या देशभरात एका गुजरात चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाने गुजराती चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर आणत मोठा इतिहास रचला आहे. या चित्रपटाचं नाव म्हणजे “लालो श्रीकृष्ण सदा सहायते”. या गुजराती चित्रपटाने गुजरातमध्ये मोठे यश मिळवले असून मुंबईसारख्या शहरात देखील चित्रपटाचे शोज हाउसफुल होत आहे. आता येत्या 28 नोव्हेंबरला या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन देखील रिलीज होणार आहे, जो संपूर्ण डब केला असेल.
दिनांक 10 ऑक्टोबर 2025 प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 30 लाखांचा गल्ला जमावाला. मात्र, जसजसे दिवस सुरू लागले त्याप्रमाणे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेज वाढू लागली. अखेर चौथ्या आठवड्यापर्यंत हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला. हा पहिलाच गुजराती चित्रपट आहे , ज्याने एकाच दिवशी 5 कोटींचा गल्ला जमावाला.
लवकरच रहस्य उघडणार! ‘Tumbbad’ दिग्दर्शक Rahi Barve पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस, ‘मयसभा’ Teaser आउट
या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 71 कोटी रुपयांची कमाई करत जोरदार गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार असल्याचे चित्र दिसत आहे. कोणत्याही गुजराती चित्रपटासाठी हे खरोखरच खूप मोठे यश मानले जात आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचं एकूण बजेट केवळ 50 लाख रुपये होतं. इतक्या मर्यादित खर्चात बनवलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकित सकिया यांनी केले आहे.
या यशामागे कलाकारांचं योगदानही तितकंच महत्त्वाचं आहे. चित्रपटात रीवा रच्छ, श्रुहद गोस्वामी, करण जोशी, अन्शु जोशी आणि किन्नल नायक यांनी भूमिका साकारल्या असून, त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






