Hina Khan Slammed By Rozlyn Khan For Keeping Fast And Doing Workout Amid Cancer
सध्या रमजानचा महिना सुरु आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी रमजानच्या महिन्यात रोजाचा उपवास करताना दिसत आहे. अशातच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हिना खाननेही रोजाचा उपवास पकडला आहे. अभिनेत्रीला कॅन्सरचे निदान झाले असतानाही ती रोजाचा उपवास करत आहे. हिनाने इन्स्टाग्रामवर इफ्तार पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओही काही वेळा स्टोरी शेअर केल्या आहेत. अभिनेत्री कॅन्सर असतानाही रोजाचा उपवास करत असल्यामुळे तिच्यावर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने निशाणा साधला आहे. कॅन्सर असतानाही कसा काय रोजाचा उपवास करु शकते ? असा सवाल अभिनेत्रीने उपस्थित केला.
मिका सिंगची शाहरुख विरोधात तक्रार, मागितलेली भेटवस्तू न दिल्याने नाराज
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रोझलिन खान हिने इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वी एक पोस्ट शेअर केलीये. त्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने हिना खानवर टीका केली आहे. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये हिना खान म्हणते, “मुस्लिम लोकांचा दररोजचा रोजा १३ ते १४ तासांचा असतो. ह्या उपवासादरम्यान काहीही खायचं किंवा प्यायचं नसतं. रोजाचा उपवास करणं म्हणजे फार कठीण व्रत आहे. सामान्य व्यक्तीलाही हा उपवास पकडणं कठीण जातं. त्यात रोजाच्या उपवासात जीम करणं म्हणजे… संध्याकाळी उपवास सोडल्यानंतरच हे शक्य आहे.”
हिना खानच्या उपवासावर रोझलिन खानने हिनावर नाव न घेता टीका केली आहे, ती म्हणते, “जर एखादा कर्करोगाचा रुग्ण, जो अजूनही केमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपी घेत आहे, तो असे केल्याचा दावा करतो, तर ते मानवीदृष्ट्या अशक्य आहे. कॅन्सरवर उपचार घेत असताना औषधांसोबतच तुम्हाला योग्यप्रकारे आहार घ्यावा लागतो. त्याबरोबरच खूप पाणी पिऊन तुम्हाला शरीर हायड्रेटेड ठेवायचं असतं. अल्लाह मला माफ करेल कारण मी यावर्षीही रोजा नाही ठेवू शकत.” असं अभिनेत्री शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हणाली.
दरम्यान, अभिनेत्री रोजलिन खान स्वत: एक कॅन्सरग्रस्त असून ती सध्या आजारावर उपचार घेत आहे. याआधीही तिने हिनावर टीका केली होती. आता पुन्हा अभिनेत्रीवर हिनाने रोजाचा उपवास ठेवल्यामुळे तिच्यावर निशाणा साधला आहे.