Sqiud Game 2 (फोटो सौजन्य-Instagram)
Netflix च्या प्रसिद्ध कोरियन सिरीज Squid Game चा पहिला सीझन तीन वर्षांपूर्वी 2021 मध्ये रिलीज झाला होता, ज्याने जगभरात खळबळ उडवून दिली होती. पहिल्या सीझनमध्ये सुमारे 9 भाग होते. या शोला प्रचंड लोकप्रियता मिळाली, त्यामुळे दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहिली जात होती. आता हा २ भाग देखील चाहत्यांच्या लवकरच भेटीला येणार आहे त्यामुळे त्यांना याची आणखी वाट पाहावी लागणार नाही आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, दुसऱ्या सीझनची घोषणा करताना निर्मात्यांनी Lee Jung Jae चा एक लुक शेअर केला होता. आता 6 महिन्यांनंतर निर्मात्यांनी रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. चाहते यासाठी खूप उत्सुक आहेत.
स्क्विड गेम 2 रिलीजची तारीख केली जाहीर
गुरुवारच्या पहाटे म्हणजे 1 ऑगस्टला, स्क्विड गेमच्या चाहत्यांना एक आश्चर्यकारक धक्का मिळाला आहे. या सिरीजचा आता दुसरा सीझन कधी रिलीज होत आहे हे नेटफ्लिक्सने जाहीर केले आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये अगदी नवीन हंगामासह ही सिरीज चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
स्क्विड गेम 3 ची देखील केली घोषणा
या शोच्या निर्मात्यांनी सीझन 2 रिलीज झाल्यानंतर सीझन 3 ची घोषणा देखील केली आहे, जो 2025 मध्ये रिलीज होणार आहे. तसेच या सिरीजचा सीझन 3 हा शेवटचा सीझन असणार आहे.
शेअर केलेल्या टीझर व्हिडिओमध्ये स्पर्धकांचा एक नवीन गट एका गेममध्ये सहभागी होताना दिसत आहे. लाल आणि काळ्या रंगाचे कपडे घातलेले सैनिक बाजूला उभे राहून लोकांना धावत्या ट्रॅकवर पडताना आणि मरताना या मध्ये दिसून येत आहे, या मथळ्यासह – खरा खेळ सुरू होतो. स्क्विड गेम सीझन 2 हा 26 डिसेंबर रोजी येत आहे, फक्त नेटफ्लिक्सवर असे Netflix ने कॅप्शनमध्ये लिहिले असून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शेवटचा सीझन २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हे देखील वाचा- कोण आहे Naezy? ज्याच्या गरिबीची मुनावरने केली थट्टा, एका म्युझिक व्हिडिओने झाला प्रसिद्ध!
नवीन हंगामात कोणाचा होणार समावेश
हा एक थ्रिलर शो आहे, ज्याच्या केंद्रस्थानी मृत्यूचा खेळ आहे. शोचा मुख्य अभिनेता Lee Jung Jae याला ड्रामा सीरिजमधील लीड ॲक्टरमध्ये एमी अवॉर्ड देण्यात आला. अलीकडेच, नेटफ्लिक्सने चित्रांच्या माध्यमातून दुसऱ्या सीझनमधील इतर काही पात्रांची झलक दाखवली होती. त्यासोबत लिहिले होते – “प्लेअर 456 या वर्षी येणाऱ्या स्क्विड गेम सीझन 2 मध्ये काहीही करण्यास तयार आहे.” फोटोंमध्ये जंग-जे, ली बायंग-हुन आणि गोंग यू यांचा समावेश होता. आणि त्यांच्या धमाकेदार भूमिका देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.