(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
होम्बले फिल्म्स आणि ऋषभ शेट्टी यांची कांतारा: चैप्टर 1 या चित्रपटाने भारतीय सिनेमा आणि कथा सांगण्याच्या शैलीला नव्याने परिभाषित केले आहे. सुमारे महिनाभरापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता जागतिक स्तरावर सनसनाटी ठरत आहे. आपल्या अद्भुत दृश्यप्रभावांनी आणि लोककथांना जिवंत करणाऱ्या अनोख्या सादरीकरणामुळे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडले आहेत आणि पहिल्या भागाच्या तुलनेत दुप्पट कमाई केली आहे. दिवाळीच्या काळात हा चित्रपट सर्वात मोठा विजेता ठरला आहे.
आपल्या दैवी कथा-वाचनशैलीमुळे, खोल सांस्कृतिक मुळांमुळे आणि असाधारण सिनेमॅटिक दृष्टीमुळे कांतारा: चॅप्टर 1 जगभरातील प्रेक्षकांना मोहवून टाकत आहे. चित्रपटाने आता ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जागतिक स्तरावर 852 कोटींचा टप्पा पार करून आणि स्वतःला भारतीय सिनेमातील सर्वात प्रशंसित आणि विक्रम मोडणाऱ्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे.
4000 कोटींचा रामायण सिनेमा! Vivek Oberoi मात्र फुकटात करतोय काम… म्हणाला, ‘मी माझी सगळी…’
हे प्रचंड आकडे दाखवतात की या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना आपल्याकडे खेचले आहे आणि चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. ऋषभ शेट्टींच्या अप्रतिम अभिनयामुळे, दमदार संगीतामुळे, मोहक छायाचित्रणामुळे आणि मनमोहक पार्श्वभूमीमुळे कांतारा: चैप्टर 1 एक खरा ब्लॉकबस्टर ठरला आहे. आता हा चित्रपट आपला जागतिक प्रवास आणखी पुढे नेण्यासाठी सज्ज आहे. कारण तो 31 ऑक्टोबर 2025 रोजी इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
कांतारा: चॅप्टर 1, ज्याचे दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले आहे, हा 2022 मधील ब्लॉकबस्टर कांतारा या चित्रपटाचा प्रीक्वल आहे. जो समीक्षक आणि प्रेक्षक दोघांमध्ये प्रचंड यशस्वी ठरला होता. हा अध्याय चौथ्या शतकात स्थापित असून, कांताराच्या पवित्र भूमीच्या रहस्यमय उत्पत्तीची कथा उलगडतो. हा चित्रपट तिच्या प्राचीन पौराणिक कथांमध्ये, शाश्वत संघर्षांमध्ये आणि दैवी हस्तक्षेपांमध्ये डोकावतो लोककथा, श्रद्धा आणि अग्नीतून जन्मलेल्या त्या गाथेची कहाणी सांगतो जी या भूमीच्या आत्म्यातून निर्माण झाली आहे.
चित्रपटात ऋषभ शेट्टी यांच्यासोबत सप्थमी गौडा, गुलशन देवैया, रुक्मिणी वसंत, जयराम, पी. डी. सतीश चंद्र, प्रकाश थुमिनाड आणि इतर अनेक प्रतिभावान कलाकारांनी अभिनय केला आहे, ज्यांनी या महाकाव्याला जिवंत केले आहे.






