अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) वृक्षारोपणसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात. दरम्यान कोल्हापूर-सातारा (Kohapur Satara Highway) रस्ता रुंदीकरणात झाडं तोडली जात आहेत. यातील काही झाडं वाचवुन महामार्गावरील झाडांच पुर्नरोपण सुरु असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. झाडांचं पुनर्रोपण सुरु असताना झाडावरील मधमाशा सयाजी शिंदेंसह इतर लोकांना चावल्या आहेत. मधमाश्यांच्या अचानक हल्ल्याने सर्वच गोंधळून गेले होते. सयाजी शिंदे यांना डोळ्याच्यावर आणि मानेला मधमाश्या (Honey Bee Attack On Sayaji Shinde) चावल्या आहेत. मात्र सयाजी शिंदे सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.
मराठी-हिंदी आणि दाक्षिणात्य अशा सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये काम करणारे अभितेने म्हणजे सयाजी शिंदे. पडद्यावर प्रत्येक भूमिका उत्कृष्टरित्या साकारणारे सयाजी रिअल हिरो आहेत. सयाजी शिंदे आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या सामाजिक कार्यासाठीदेखील ओळखले जातात. सयाजी शिंदे झाडे लावण्यासाठी काही कार्यक्रम आखत असतात आणि वृक्षतोड रोखण्यासाठीही कायम प्रयत्नशील असतात.
आजही झाडांच्या कामासाठी ते सातारा-कोल्हापूर महामार्गावर आले होते. सयाजी शिंदेनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मधमाश्यांनी आमच्यावर हल्ला केला. मात्र काळजीचं काही कारण नाही, मला दोन-तीन माश्या चावल्या आहेत. कानाभोवती थोडी सूज आली आहे. पण आम्ही आता सुखरूप आहोत. चिंतेचं काहीही कारण नाही. पुणे-बेंगळूर महामार्गावर वृक्षतोड सुरु आहे. जवळजवळ २०० वर्षे जुनी ही झाडे आहेत. त्यांची तोड केली जात आहे. ही झाडे तोडून त्यानंतर दोन-चार झाडे लावली जातात. मात्र त्याचा योग्य पद्धतीने पाठपुरावा केला जात नाही. त्यामुळे आताच पुढाकार घेऊन ही झाडे वाचवण्याचा आमचा उद्देश आहे.