फोटो सौजन्य: Social Media
महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आजपर्यत अनेक पुस्तके, कादंबरी आणि ग्रंथ लिहिली गेली आहे. आजही शिवराय जाणून घ्यायचे असेल तर लोकं महाराजांवरील पुस्तकांचा आधार घेत असतात. पण क्वचितच असे झाले असेल की महाराजांवरील कादंबरीवर चक्क वेब सीरिज बनत आहे.
अखेर सैफ अली खानने त्या रिक्षाचालकाची घेतली भेट; काय दिलं बक्षीस? वाचा सविस्तर
हल्ली अनेकांना खजिना आणि त्यासंबंधित असणारे रहस्य या विषयावर आधारित कादंबरी वाचायला आणि विविध कलाकृती पाहायला आवडत असतात. म्हणूनच तर गेल्या काही वर्षात अशीही काही पुस्तक प्रकाशित झाली ज्यांचा आशय ‘खजिना आणि तो मिळवण्यासाठी होणारी धडपड’ असा होता. मराठी साहित्यात असा विषय असणारी पुस्तक तशी फार क्वचितच आहे. पण आता ही स्थिती बदलू लागली आहे. आज नवोदित लेखक इतिहास आणि वर्तमानाची सांगड घालून थरारक कथा सादर करत आहे. आज आपण अशाच एका आगामी वेब सीरिजबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याची कथा एका मराठी ऐतिहासिक रहस्यमयी कादंबरीवर बेतलेली आहे.
काही वर्षांपूर्वी मराठी साहित्यात एक अशी ऐतिहासिक रहस्यमयी कादंबरी प्रकाशित झाली, जिने फक्त जुन्या नाही तर नवीन वाचकांना आपल्या भन्नाट कथेकडे आकृष्ट केले. हि कादंबरी म्हणजे डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे लिखित ‘प्रतिपश्चंद्र’. विजयनगर साम्राज्याचा खजिना, शिवाजी महाराज आणि वर्तमानात हा खजिना मिळवण्यासाठी होणारी धडपड या थरारक कथानकावर आधारित ही कादंबरी आहे. विशेष म्हणजे आता या कादंबरीवर हॉटस्टार स्पेशलची नवीकोरी वेब सीरिज ‘दि सिक्रेट ऑफ दि शिलेदार्स’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे.
2024 मध्ये ‘दि सिक्रेट ऑफ दि शिलेदार्स’ या वेब सीरिजची घोषणा झाली होती. या सीरिजच्या भन्नाट विषयामुळे अनेक प्रेक्षक आणि ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे, त्यांना या सीरिजबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा टिझर रिलीज झाला होता. ज्यात पहिल्यांदाच काहीतरी वेगळं पाहायला मिळणार असं दिसत आहे. येत्या ३१ जानेवारीला ही सीरिज डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. शिवरायांच्या काळात १७ व्या शतकातील लपवलेल्या रहस्याचा २१ व्या शतकात शोध लागणार, अशी या वेबसीरिजची टॅगलाइन आहे.
या सीरिजमध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत असणार आहे. तर सई ताम्हणकर, गौरव अमलानी आणि आशिष विद्यार्थी प्रमुख भूमिकेत असणार आहे. तसेच जेष्ठ अभिनेते दिदलीप प्रभावळकर सुद्धा या सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे.