चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला विनोदवीर म्हणदे कुशल बद्रिके (Kushal Badrike). त्याच्या अचूक कॅामिक टायमिंगने त्यांना प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. आता कुशल त्याच्या कॅामेडीने आता हिंदी प्रेक्षकांनाही हसवण्यास सज्ज झाला आहे. कुशल आता एका नव्या हिंदी रिअॅलिटी कॅामेडी शोमध्ये झळकणार आहे. नुकतच त्याने या शोचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. त्याच्या चाहत्यांनी देखील यावर कमेंट्स करत कुशलला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
[read_also content=”‘जेव्हा कुटुंबाचा प्रश्न येतो, तो प्रत्येक ‘शैतान’शी लढतो…’ अजय देवगणच्या चित्रपटाचं दमदार पोस्टर रिलीज! https://www.navarashtra.com/movies/ajay-devgan-starer-shaitaan-new-poster-released-nrps-508565.html”]
सोनी टिव्हीवर ‘मॅडनेस माचऐंगे’ हा नवा कॅामेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमधून कुशल देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुशलने त्याच्या सोशल मीडिया अंकाऊट वरुन पोस्ट शेअर केली आहे. तसेच हा प्रोमो शेअर करत कुशलने म्हटलं की, ‘एका हिंदी मालिकेतून तुम्हाला हसवण्या साठी येतो आहे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सोबत असूद्या.’