पुणे : काही वर्षापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (V. D. Savarkar) यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर राहुल गांधींवर सावरकर प्रेमींनी जोरदार हल्लाबोल करत राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन (Protest) केले होते. सावरकर विचारसरणींच्या लोकांच्या मनात अजून सुद्धा राहुल गांधींची टिका ताजी आहे, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आज पुण्यात पाहयला मिळाला. लहान मुलांना सावरकर समजले पण त्या दिल्लीतल्या (delhi) घोड्याला सावकार कळाले नाहीत, अशी जहीर टीका अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव न घेता केली आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जीवन कथेवर आधारित एका कार्यक्रमात ते पुण्यात (Pune) बोलत होते. दरम्यान, पुढे बोलताना अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) म्हणाले की, सावरकरप्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे, लोकं घाबरली पाहिजेत असं पोंक्षे म्हणालेत. त्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया (Reaction) उमटण्याची शक्यता आहे.
[read_also content=”पक्षाची काय पडझड झाली आहे, संजय राऊतांना आता तरी कळले पाहिजे – देवेंद्र फडणवीस navarashtra.com/india/devendra-fadnavis-criticize-on-shivsena-mp-sanjay-raut-in-new-delhi-307654/”]
दरम्यान, सावरकरांचे विचार, व जाज्वल देशप्रेम हे सर्वांना कळले पाहिजे. सावरकारांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य व त्यांचा त्याग हे देशात सर्वंत्र पसरले पाहिजे. असं सुद्धा अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले. महाराष्ट्रात एकच गोळवलकर विद्यालय का आहे? प्रत्येक गावात असे विद्यालय हवेत, असे सावरकर कार्यक्रम व्हायला हवे, या मुलांनी खूप छान कार्यक्रम केला. पुढील पिढिला सावरकर तसेच स्वातंत्र्य सेनानी कळले पाहिजे, यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिज. तसेच सावरकरप्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे, लोकं घाबरली पाहिजेत असं अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले.