(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचा बहुचर्चित आगामी चित्रपट ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरील अनेक मजेशीर Behind The Scenes (BTS) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातीलच एक भन्नाट व्हिडीओ अभिनेता मनीष पॉल ने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर रिक्षा चालवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये मनीष पॉल रिक्षाच्या मागच्या सीटवर बसलेला असून गंमतीत म्हणतो, “भाऊ, मी एक खूप महागडा माणूस आहे… मी एका नवीन रिक्षाचालकाला कामावर ठेवला आहे.” यानंतर कॅमेऱ्याकडे बघत जान्हवी कपूर हसत रिक्षा चालवताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करताना मनीषने लिहिलं आहे:
“कूकूची सवारीसुद्धा अपग्रेड झाली… ड्रायव्हर आहे स्वतः तुलसी कुमारी! आम्हाला शूटिंग करताना मजा आली.” त्याचबरोबर, मनीषने हेही सांगितलं की, जान्हवी कपूरच्या मागे वरुण धवनही रिक्षा चालवत होता.” मनीषने शेअर केलेल्या या व्हिडिओवर जान्हवीने कमेंट देखील केली आहे. स्वत:चेच कौतुक करत म्हणाली, ”बेस्ट रिक्षाचालक” हा व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल होत असून अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
महेश बाबूची डेन्व्हरसह हातमिळवणी! नवं प्रीमियम कलेक्शन आणलं बाजारात
बायोपिक्सचा सम्राट सुबोध भावे आता ‘नीम करोली बाबा’ यांच्या भूमिकेत!
बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी वरुण धवन आणि जान्हवी कपूर लवकरच त्यांच्या आगामी चित्रपटात पुन्हा एकत्र झळकणार आहेत. ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या रंगीबेरंगी प्रेमकथेमुळे हे दोघं सध्या चर्चेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतन करत असून, धर्मा प्रॉडक्शन आणि मेंटर डिसायपल एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे. सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटात वरुण धवन ‘सनी’च्या भूमिकेत, तर जान्हवी कपूर ‘तुलसी कुमारी’च्या भूमिकेत आहे. याशिवाय, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, अक्षय ओबेरॉय आणि मनीष पॉल हे कलाकारही यात आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.