3 Idiots Fame Actor Rahul Kumar Played Millimeter Role Now Looks Different
राजकुमार हिरानी दिग्दर्शित, ‘3 इडियट्स’ ह्या सुपरहिट चित्रपटाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. चित्रपटातील अनेक सीन्स, डायलॉग्स आणि गाणी याने हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. मुख्य बाब म्हणजे, चित्रपटातले अनेक पात्र आजही प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे, मिलीमिटर… हे पात्र अभिनेता राहुल कुमारने साकारलं आहे. २००९ साली रिलीज झालेल्या चित्रपटातील मिलीमिटर आणि सध्याचा मिलीमिटरमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. तुम्हाला तो आता ओळखू येणं ही अशक्य आहे. आता हा अभिनेता कसा दिसतो, काय करतो याची उत्सुकता तुम्हालाही असेलच. बघुया मिलीमीटर आता कसा दिसतो?
“त्यांना परमेश्वराने अमरत्व द्यावं…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं रतन टाटा आणि बाबा आमटेंविषयी मत
प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या कादंबरीवर आधारित ‘३ इडियट्स’ हा चित्रपट २००९ साली सर्वात हिट चित्रपटांपैकी एक ठरला. त्यात आमिर खान, शर्मन जोशी, आर माधवन आणि करीना कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्यासोबत मिलिमीटरची भूमिका साकारणारा, अभिनेता राहुल कुमारही प्रमुख भूमिकेत होता. चित्रपटात मिलिमीटरची भूमिका साकारणारा राहुल कुमार आता मिलिमीटर राहिला नाही तर तो सेंटीमीटर झाला आहे. हो, राहुलचा लूक आता खूपच बदलला आहे. तो आता ओळखू येणंही अशक्य झाला आहे. तो अनेकदा त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. इन्स्टाग्रामवर त्याचे ३६००० हून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याने वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात केली. त्याने बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
इंजिनियरिंगमधील अडीअडचणी दाखवणारा आणि विद्यार्थ्यांच्या समस्या हटके पद्धतीने मांडणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता राहुल कुमारने मिलीमीटरची भूमिका साकारली असून तो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची कामं करायचा. लाँड्री, गरजेच्या वस्तू आणून देणे, अभ्यासक्रमात लागणाऱ्या पेपर्सचे झेरॉक्स आणून देणे अशी अनेक कामं तो करायचा. २००९ काही फुट उंचीचा दिसणारा हा आता चांगलाच मोठा दिसत आहे. त्याला ओळखणंही मुश्किल झालंय. राहुलने अजय देवगण आणि करीना कपूर स्टारर ‘ओमकारा’ चित्रपटात सैफ अली खानच्या मुलाचा रोल प्ले केला होता. यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. याशिवाय तो ‘ब्लू अंब्रेला’ चित्रपटातही दिसला होता. राहुलने शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूरसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबरही काम केलं आहे. तर ‘बंदिश बँडिट्स’ या प्रसिद्ध वेबसिरीजमध्येही तो झळकला आहे.
२०२१ साली आलेल्या परिणीती चोप्राच्या ‘संदीप और पिंकी फरार’ चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. चित्रपटांशिवाय तो ‘फिर भी ना माने बद्तमीज दिल’,’यम है हम’,’नीली छतरी वाले’ या मालिकांमध्येही झळकला आहे. अभिनयाव्यतिरिक्त, राहुलला गाण्याचीही खूप आवड आहे, तो अनेकदा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे गाण्याचे व्हिडिओ शेअर करतो, ज्यामध्ये तो गिटार देखील वाजवतो. पण, ‘3 इडियट्स’ मधला मिलिमीटर आता खऱ्या अर्थाने सेंटिमीटर झाला आहे.