PBKS Vs SRH Live Streaming (फोटो- ट्विटर)
एसआरएचने दिले पंजाब किंग्जला दिलेले 236 रन्सचे टार्गेट
हैदराबादच्या गोलंदाजांची पंजाबच्या फलंदाजांवर पकड
कूपर कॉनलीची शतकी खेळी गेली व्यर्थ
Tata IPL 2026 PBKS Vs SRH Live Updates: आज हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जमध्ये सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली. एसआरएचने प्रथम फलंदाजी करून पंजाबला 236 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर (IPL 2026) या सामन्यात एसआरएचने पंजाब किंग्जचा 33 रन्सने पराभव केला आहे. आता पॉईंट्स टेबलमध्ये एसआरएच पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
पंजाब किंग्जची फलंदाजी
एसआरएचने दिलेल्या 236 रन्सचा पाठलाग करण्यासाठी पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य़ यांनी सुरुवात केली. मात्र या दोघा सलामीवीरांना नेहमीसारखी साजेशी खेळी करता आली नाही. प्रियांश आर्य़ केवळ 1 रन करून आउट झाला. तर त्या पाठोपाठ प्रभसिमरन सिंग देखील 3 रन्स करून आउट झाला.
त्यानंतर कूपर कॉनली आणि कर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी मैदानात आले. कूपर कॉनलीने एकट्याने झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्याने आपले शानदार अर्धशतक पूर्ण केले. तर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला कर्णधार श्रेयस अय्यरसुद्धा 5 रन्स करून आउट झाला. त्यानंतर 236 रन्सचा पाठलाग करताना पंजाबची फलंदाजी ढासळली. स्टॉयनीसने 28 रन्सची खेळी आहे. सूयश शेडगेने 25 रन्स केल्या. तर फिल्डिंग करताना दोन कॅच सोडणारा शशांक सिंग केवळ 4 रन्स करून आउट झाला.
PBKS Vs SRH Live: हेनरीचा ‘क्लास’ अन् किशनसमोर ‘किंग्ज’ थबकले, पंजाबला ‘इतक्या’ रन्सची गरज
एसआरएचची गोलंदाजी
एसआरएचच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पंजाबच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले. पॅट कमिन्सने प्रियांश आर्य़ आणि सुयश शेडगेची विकेट पटकावली. तर नितीश कुमार रेड्डीने फॉर्ममध्ये असणाऱ्या प्रभसिमरनची विकेट घेतली. एशान मलिंगा, साकीब हुसेनने अनुक्रमे कर्णधार श्रेयस अय्यर आणि शशांक सिंगला आउट केले. शिवांग कुमारने स्टॉयनीसला आउट केले.
एसआरएचची फलंदाजी
श्रेयस अय्यरने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एसआरएचकडून डावाची सुरुवात करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने केली. गेल्या काही सामन्यांमध्ये या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे आज देखील दोघांनी तडाखेबंद सुरुवात करून दिली. आक्रमक फलंदाज असलेल्या अभिषेक शर्माने 13 बॉलमध्ये 35 रन्सची खेळी केली. आक्रमक खेळी करून अभिषेक शर्मा आउट झाला. त्यानंतर एसआरएचचा माजी कर्णधार इशान किशन आणि हेडने संघाचा डाव सावरला.
🔟 overs to go! Suryansh Shedge joins Cooper Connolly in the middle 🤝#PBKS need 145 runs from 60 deliveries Updates ▶️ https://t.co/8L0gAuxW78#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvPBKS pic.twitter.com/3hWinVXULc — IndianPremierLeague (@IPL) May 6, 2026
ट्रेविस हेडने देखील चांगली सुरुवात केली. ट्रेविस हेड 19 बॉलमध्ये 38 रन्स करून आउट झाला. इशान किशानने शानदार अर्धशतकी खेळी केली. इशान किशनने 55 रन्सची खेळी केली. इशान किशन आउट झाल्यावर हेनरी क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डीने एसआरएचला 200 पेक्षा जास्त करून दिल्या. हेनरी क्लासेनने तडाखेबंद अर्धशतक लगावले. नितीश कुमार रेड्डीने 29 रन्सची लहानशी पण अत्यंत महत्वाची अशी खेळी केली आहे. हेनरी क्लासेनने 43 बॉलमध्ये 69 रन्स केल्या.
पंजाब किंग्जची गोलंदाजी
एसआरएचच्या फलंदाजांना रोखण्यासाठी अर्शदीप सिंग आणि मार्को जानसने या पंजाबच्या गोलंदाजांनी सुरुवात केली. दरम्यान आक्रमक सुरुवात करणाऱ्या अभिषेक शर्माला लॉकी फर्ग्युसनने आउट केले. तसेच युझवेंद्र चहलने ट्रेविस हेडला 38 रन्सवर आउट केले. अर्शदीप सिंगने एसआरएचच्या इशान किशनला 55 रन्सवर आउट केले. अर्धशतकी खेळी करून धोकादायक ठरणाऱ्या हेनरी क्लासेनला विजयकुमार वैशाखने 69 रन्सवर आउट केले.
IPL 2026: शशांकचा तो ‘ड्रॉप कॅच’ अन् Shreyas चा भयानक अवतार; मैदानात काय घडलं? पाहा Viral Video
एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नीतीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, सलिल अरोरा, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, लियाम लिविंगस्टोन, प्रफुल हिंगे.
पंजाब किंग्जची संभाव्य टीम:प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग / नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, अझमतुल्ला ओमरझाई, मार्को यानसेन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.






