Shashank Singh Catch Drop (फोटो- ट्विटर)
एसआरएचने पंजाबला दिले 236 रन्सचे टार्गेट
शशांक सिंगने एकाच सामन्यात सोडले दोन कॅच
क्लासेन आणि इशानने केली पंजाबची धुलाई
Tata IPL 2026 Shashank Singh/ SRH Vs PBKS Live Updates: हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जमध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने टॉस जिंकून (IPL 2026) गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एसआरएचने पंजाबला 236 रन्सचे टार्गेट दिले आहे. दरम्यान या समण्यान शशांक सिंगने दोन महत्वाच्या कॅच सोडल्याचे पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
आयपीएलमध्ये आज पंजाब आणि हैदराबाद आमनेसामने आले आहेत. पंजाबने प्रथम गोलंदाजी केली. एसआरएचकडून इशान किशन आणि हेनरी क्लासेनने आक्रमक खेळी केली. मात्र सध्या सोशल मिडियावर पंजाब किंग्जचा खेळाडू शशांक सिंग याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याने एक कॅच सोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Shashank Singh drops another catch. Never seen this much consistency in dropping catches, man. PBKS is giving tough competition to Pakistan in terms of dropping catches 😂 Look at Ricky Ponting’s reaction in the dugout, bro looked really frustrated 😭pic.twitter.com/cTAu3zeFUO — TEJASH (@Tejashyyyyy) May 6, 2026
पंजाबचा खेळाडू शशांक सिंगने एक साधा सोपा झेल सोडल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर इतका संतापला की, भर मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुख्य प्रशिक्षक रिकी पोंटिंग यांना धावत मैदानात यावे लागले. हेनरी क्लासेन आणि इशान किशनचा कॅच त्याने सोडला. नेमका याच दोन फलंदाजांनी पंजाबची धुलाई केली. या दोघांना जीवदान मिळाले त्यामुळे एसआरएचने 235 रन्सचा टप्पा गाठला. शशांक सिंगने कॅच सोडल्यावर रिकी पोंटिंग यांची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
‘आम्हाला अंधारात ठेवलं’! IPL Final अहमदाबादला हलवल्याने KSCA चा बीसीसीआयवर वार
एसआरएचची फलंदाजी
श्रेयस अय्यरने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एसआरएचकडून डावाची सुरुवात करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने केली. गेल्या काही सामन्यांमध्ये या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे आज देखील दोघांनी तडाखेबंद सुरुवात करून दिली. आक्रमक फलंदाज असलेल्या अभिषेक शर्माने 13 बॉलमध्ये 35 रन्सची खेळी केली. आक्रमक खेळी करून अभिषेक शर्मा आउट झाला. त्यानंतर एसआरएचचा माजी कर्णधार इशान किशन आणि हेडने संघाचा डाव सावरला.
PBKS Vs SRH Live: हेनरीचा ‘क्लास’ अन् किशनसमोर ‘किंग्ज’ थबकले, पंजाबला ‘इतक्या’ रन्सची गरज
ट्रेविस हेडने देखील चांगली सुरुवात केली. ट्रेविस हेड 19 बॉलमध्ये 38 रन्स करून आउट झाला. इशान किशानने शानदार अर्धशतकी खेळी केली. इशान किशनने 55 रन्सची खेळी केली. इशान किशन आउट झाल्यावर हेनरी क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डीने एसआरएचला 200 पेक्षा जास्त करून दिल्या. हेनरी क्लासेनने तडाखेबंद अर्धशतक लगावले. नितीश कुमार रेड्डीने 29 रन्सची लहानशी पण अत्यंत महत्वाची अशी खेळी केली आहे. हेनरी क्लासेनने 43 बॉलमध्ये 69 रन्स केल्या.






