#Lai Avadtes Tu Mala Serial Latest Update
कलर्स मराठीवरील # लय आवडतेस तू मला मालिकेत एका अनोळखी जागी झालेल्या प्रसंगातून सुरू होतो सरकार सानिका यांचा नवा प्रवास. सरकार आणि सानिकाच्या गाडीचा अपघात टळतो, त्यांची गाडी बिघडते आणि त्याचवेळी त्यांची एका अनोळखी पण मायाळू व्यक्तीशी ओळख होते अम्मा! अम्माची आगळीवेगळी एन्ट्री सगळ्या गोष्टींना वेगळं वळण देते. संकटाच्या वेळी सरकार आणि सानिकाला मदतीचा हात देणारी अम्मा त्यांना आपल्या घरी, तिच्या होमस्टेवर राहायला बोलावते. प्रेमळ स्वागत आणि पाहुणचारात ते नव्या जागेत रमायला सुरुवात करतात.
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या महाअंतिम सोहळ्यात ‘या’ अभिनेत्याला मिळाली ड्रीम कार, कलाकाराची पोस्ट चर्चेत
इतकंच नव्हे तर सानिकाची ओळख एक अल्लड, निरागस मुलगी राणीशी होते . या नव्या पात्राच्या आगमनाने सानिका आणि सरकारच्या हनीमूनमध्ये निर्माण होतो एक नवा ट्विस्ट! प्रेम, कटकारस्थानं आणि दडलेली रहस्य यांचं कोडं उलगडण्याचा प्रवास आता सुरू होणार आहे. आगामी भागात काय उलगडेल? अम्माच्या घरी नेमकं चाललंय तरी काय? राणीचं गुपित काय आहे? याची उत्सुकता वाढवणारे क्षण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत! परंतु त्यांच्या नव्या सुरुवातीवर नजर आहे ती सईची! आपल्या मनात कटाक्षाने सानिका आणि सरकारचं नातं उध्वस्त करण्याचा कट सई आखतेय.
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याने गळफास घेत संपवले स्वत:चे आयुष्य, मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का
दरम्यान, गाडी दुरुस्ती होईपर्यंत सानिकाला नवीन जागेचा फेरफटका मारायचा मोह होतो. सरकार मात्र एकांतात दोघांनी एकत्र वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त करतो. मतभेदाच्या क्षणी सानिका एकटीच बाहेर पडते आणि तिची ओळख होते एका मजेशीर पण गोड मुलीशी राणी. राणी वयाने मोठी असली तरी तिचं वागणं बालिश आहे, आणि तिच्या पहिल्याच भेटीत सानिकाचं मन जिंकते. राणी सानिकाला एका खास जागी घेऊन जाते, तर दुसरीकडे सरकार सानिकाच्या अनुपस्थितीत बेचैन होतो. ती कुठे गेली याचा शोध घेतो आणि अखेर दोघांची भेट होते. मात्र या भेटीनंतर सानिका फक्त राणीच्या गोष्टीच करते, जे सरकारला अधिकच विचारात पाडतं. बघूया मालिकेत पुढे काय घडेल. जाणून घेण्यासाठी पहा # लय आवडतेस तू मला सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.