Aata Hou De Dhingana 3 Winner Is Sameer Paranjape Won Dream Car See Photos
प्रत्येक जण आपल्या स्वप्नाच्यापाठी पळत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या पाठी पळत असताना ते केव्हा पूर्ण होतं आणि केव्हा नाही, हे कळतंच नाही. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण आपल्या स्वप्नाच्या पाठी पळतो. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ फेम अभिनेता समीर परांजपेचं आता स्वप्न पूर्ण झालेलं आहे. अभिनेत्याला एका टिव्ही रिॲलिटी शोच्या ग्रँड फिनालेमध्ये त्याचं स्वप्न पूर्ण झालं. आपल्या कतृत्वाच्या माध्यमातून अभिनेत्याने आपले स्वप्न पूर्ण केलेले आहे.
सिद्धार्थ जाधवचा गाजलेला शो ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या तिसऱ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला स्टार प्रवाहवरील अनेक कलाकारांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी अभिनेता समीर परांजपे सुद्धा उपस्थित होता. कार्यक्रमात अभिनेत्याचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे तो खूप खुश आहे. स्टार प्रवाहवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या समीरच खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं.. ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या महाअंतिम सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट धिंगाणेबाज कलाकार’ म्हणून समीरला गौरवण्यात आलं. इतकंच नाही तर मारुती सुझुकीची वॅगन आर कार त्याला भेट म्हणून देण्यात आली. यामुळे समीरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याने गळफास घेत संपवले स्वत:चे आयुष्य, मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का
शोच्या ग्रँड फिनालेमध्ये समीरला नवीकोरी गाडी भेट म्हणून मिळाल्यानंतर अभिनेत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. समीरने नव्या कारसोबतचे आणि कारच्या चावीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत. नवीन कार जिंकल्यानंतर समीरने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. तो शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतो, “स्टार प्रवाह वाहिनी, सतिश राजवाडे सर, श्रीप्रसाद क्षीरसागर सर, सुमेध म्हात्रे आणि सिद्धार्थ जाधव माझ्या भावा… तुम्ही दिलेल्या सरप्राईजसाठी आणि मौल्यवान क्षणांसाठी खूप खूप आभार! तुम्ही मुलगा म्हणून मोठं केलंत, त्यामुळे अंगावर चढलेल्या मूठभर मासासाठी कायम तुम्हा सगळ्यांच्या ऋणात आहे.” दरम्यान, समीरने शेअर केलेल्या ह्या पोस्टवर ऋतुजा बागवे, समृद्धी केळकर, आशुतोष गोखले, अक्षया नाईक, ओमप्रकाश शिंदे या कलाकारांनी कमेंट्स करत समीरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.