Abhidnya Bhave Husband Mehul Pai Post About Shree Swami Samarth Divine Experience
अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचे लाखो भाविक आहेत. भाविकांची त्यांच्यावर श्रद्धा देखील आहे. प्रत्येकाला स्वामी आपल्यासोबत कोणत्या ना कोणत्या रुपात तरी का होईना असल्याची प्रचिती येत असते. फक्त सामान्य मंडळीच नाही तर सेलिब्रिटीही स्वामींचे भक्त आहेत. अशातच स्वामींच्या दर्शनाचा एक अविस्मरणीय अनुभव अभिनेत्री अभिज्ञा भावेचा (Abhidnya Bhave) पती मेहुल पै याने शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
ऑस्कर विजेते MM Keeravani यांच्यावर प्रसिद्ध गायिकेचे गंभीर आरोप, रिॲलिटी शोचा केला पर्दाफाश!
मेहुल १९ एप्रिलला स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी गेला होता. दरम्यान, मेहुलने त्याला आलेला अनोखा अनुभव आपल्या पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे. त्याची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनुभव सांगताना मेहुल म्हणाला की,
आजचा माझा दिवस आणि अनुभव… १९ एप्रिल २०२५ हा दिवस खूप वेगळा आणि अंतर्मुख करणारा होता. मी मठात गेलो होतो आणि पायऱ्या चढत असताना एक वृद्ध आजोबा भेटले. त्यांच्या हातातली एक साधी प्लास्टिकची पिशवी मला धरायला दिली. त्यांच्या हालचालींत एक अशक्तपणा जाणवत होता… आणि तेव्हा जाणवलं, कदाचित त्यांना Parkinson चा त्रास असावा. ते अत्यंत श्रद्धेने म्हणाले, “मी आधी स्वामींच्या पाया पडतो, मग माझी बॅग धरतो… आता तू पायापड…” त्या शब्दांतली त्यांच्या भक्तीची ताकद आणि समर्पण मनाला स्पर्शून गेलं. मग आम्ही एकत्र सगळ्या देवांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर ते उपासनेला बसले. शांत, गूढ आणि स्थिर नजरेतून त्यांनी विचारलं, “थोडा वेळ थांबशील का मी उपासना करेपर्यंत ?” मी थांबलो… आणि त्या क्षणात एक न सांगता येणारा आत्मिक संवाद झाला. उपासना झाल्यावर आम्ही बाहेर आलो. त्यांनी खूप आपुलकीने विचारलं, “घरी कोण-कोण आहे रे तुझ्या ?” मी प्रेमाने सगळं सांगितल्यावर, ते म्हणाले, “येत्या २४ एप्रिलला बायकोला पुरणपोळी करायला सांग… आणि मग परत मठात ये. इथेच स्वामीपुढे ती ठेव. आणि बघ… लवकरच तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.” थोड्या वेळाने, ते हसत म्हणाले, “तू कुठे चाललायस?” आणि शेवटी हळुवारपणे विचारलं – “थोडं पुढे रस्ता क्रॉस करून देशील का?” असं झालं आज स्वामींचं दर्शन….. एक साधा वाटणारा प्रसंग… पण मनाच्या आत खोलवर स्पर्श करून गेला. कधी कधी अनोळखी व्यक्तीकडून मिळणारी आपुलकी, रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक खरी वाटते… “स्वामींच्या चरणांशी जोडले गेलेले काही क्षण, मनात आयुष्यभरासाठी घर करून जातात… आणि त्यांची कृपा कोणत्या रूपात भेटेल, हे कधीच सांगता येत नाही.”
600 Not Out! ‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर विजयी गर्जना; विकी कौशलच्या वडिलांची लेकासाठी खास पोस्ट, म्हणाले…