Lalit Manchanda Committed Suicide In Meerut Source Revealed Actor Was Suffering From Mental Stress
हिंदी टेलिव्हिजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ललित मनचंदा यांनी मेरठमधील आपल्या राहत्या घरी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले आहे. अभिनेत्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने मेरठमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ललित मनचंदा हा एक प्रसिद्ध टिव्ही अभिनेता असून त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांतही काम केले आहे. त्याची एक वेबसीरीजही प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होती, त्या वेबसीरीजमुळे तो कमालीचा उत्सुक होता.
अभिनेता ललित मनचंदाने मेरठमधल्या आपल्या राहत्या घरी, गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या आत्महत्येचं नेमकं कारणही समोर आलं आहे. नेमकं त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचं उत्तर पोलिसांना पोलिस चौकशीमध्ये मिळाले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय अभिनेत्याने त्याच्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी ललितच्या कुटुंबाची आणि मित्रांची चौकशी सुरू केली आहे, जेणेकरून या आत्महत्येची कारणे समजू शकेल. अभिनेत्याच्या घरी कोणतीही आत्महत्येची चिठ्ठी आढळली नाही. त्यामुळे तपास अधिक खोलवर करण्याची गरज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक लोक आणि शेजाऱ्यांनाही या घटनेने मोठा धक्का बसला आहे. कारण ललित एक अतिशय शांत आणि विचारी स्वभावाचा व्यक्ती मानला जात होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आत्महत्येच्या घटना सहसा मानसिक आरोग्यामुळेच होत असतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तणाव आणि उदासीनतेने ग्रस्त असलेल्या लोकांना वेळीच मदत आणि समर्थनाची गरज असते. ललितच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे आणि ही घटना समाजासाठी एक इशारा आहे की, मानसिक आरोग्याला गांभीर्याने घेतले पाहिजे.