(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
स्टार प्लस, जिओस्टार आणि कलेक्टिव मीडिया नेटवर्क मिळून भारतीय दूरदर्शनच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. भारतातील पहिली AI-समर्थित प्रीमियम एंटरटेनमेंट मालिका ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.ही भव्य पौराणिक गाथा २६ ऑक्टोबरपासून स्टार प्लसवर प्रसारित होणार आहे. तर याचं डिजिटल प्रीमियर २५ ऑक्टोबर रोजी जिओहॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.या मालिकेद्वारे स्टार प्लस आपली ती गौरवशाली परंपरा पुढे नेत आहे. अशी परंपरा जी पिढ्यानपिढ्या भारतीय प्रेक्षकांना भव्य आणि अनोखा मनोरंजन देत आली आहे.‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ हे AI च्या साहाय्याने एका नव्या रूपात सादर करण्यात येणार आहे. यात पौराणिक कथा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी भावना यांचा अद्भुत संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. असा अनुभव जो भारतीय टेलिव्हिजनवर यापूर्वी कधीही पाहिला गेला नाही.
१०० एपिसोडची ही भव्य मालिका पांडव आणि कौरव यांच्यात झालेल्या अमर युद्धाला एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ही कथा इतक्या सुंदर आणि प्रभावी पद्धतीने सादर केली गेली आहे की प्रेक्षक त्यातील भावना आणि भव्यता यामध्ये हरवून जातील.AI-आधारित स्टोरीटेलिंगच्या मदतीने हा शो भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा आणि भविष्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा एक अनोखा संगम घडवतो आहे.
“मी करंजीसारखी..”,शिवानी सोनार लग्नानंतर साजरी करणार पहिली दिवाळी, अंबरकडून मिळणार सरप्राइज
ट्रेलर लॉन्चच्या वेळी कलेक्टिव आर्टिस्ट नेटवर्कचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ विजय सुब्रमण्यम म्हणाले, “आपल्यापैकी अनेकांसाठी महाभारत ही फक्त एक कथा नाही, तर आपल्या आई-वडिलांकडून आणि आजी-आजोबांकडून ऐकलेली गोष्ट आहे. हा ट्रेलर म्हणजे पुढे येणाऱ्या भव्य अनुभवाची फक्त एक झलक आहे. हा अनुभव भावना, भव्यता आणि पूर्णपणे गुंतवून ठेवणारा असेल.”
जिओ स्टारचे सीईओ एंटरटेनमेंट केविन वाझ यांनी ट्रेलर लॉन्चच्या वेळी सांगितले, “‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ हा आमच्या विश्वासाचा उत्सव आहे. असा संगम ज्यात अमर महाकाव्य आणि मशीन इंटेलिजन्स एकत्र येऊन नव्या भारताची आत्मा सादर करतात. या मालिकेद्वारे आम्ही परंपरा आणि भविष्य यांच्यात एक मजबूत पूल उभा करत आहोत.”‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ या मालिकेसोबत स्टार प्लस एक मोठं पाऊल पुढे टाकत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना पौराणिकता आणि आधुनिकतेचा अप्रतिम संगम अनुभवता येणार आहे.