मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपमागील नेमकं कारण काय ? मोजक्या शब्दातच अभिनेत्रीने केला खुलासा
एक काळ असा होता की मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. मात्र आता ब्रेकअपनंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे कपल ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. अद्याप ह्या कपलने ब्रेकअपबद्दल चाहत्यांना अधिकृत माहिती दिलेली नाही. पण अभिनेत्रीने काही तासांपूर्वीच शेअर केलेल्या पोस्टने मलायका आणि अर्जुनचं खरोखरंच ब्रेकअप झाले आहे का ? याचा खुलासा आहे. शिवाय तिने कारणही सांगितले आहे. मलायकाची इन्स्टा स्टोरी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘सिंघम अगेन’च्या प्रमोशन दरम्यान अर्जुन कपूरने काही मुलाखतींमध्ये तो सिंगल असल्याचेच त्याने सांगितलेय. तेव्हापासून सोशल मीडियावर त्यांच्या ब्रेकअपची चर्चा होत आहे. काही तासांपूर्वीच मलायकाने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने चाहत्यांना ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे. “प्रयत्न हा प्रेमाचा प्राणवायू आहे… त्याशिवाय आग मरते.” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे. अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली असून तिच्या आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपने सगळ्यांचेच लक्ष वेधलेय.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपमागील नेमकं कारण काय ? मोजक्या शब्दातच अभिनेत्रीने केला खुलासा
Makl-मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरचे नाव अभिनेत्री कुशा कपिलासोबत जोडले जात आहे. एवढेच नाही तर अर्जुन आणि मलायका यांच्या ब्रेकअपचे कारण कुशा असल्याचे बोलले जात होते. अर्जुन आणि कुशा डेट करत असल्याचे बोलले जात होते. मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर कुशासोबत करण जूरच्या पार्टीत दिसला होता. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. शिवाय, अनेकदा कुशाने अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांना मुर्खपणा म्हणत अफवा फेटाळून लावल्या होत्या. कुशा म्हणाली होती की, मी फक्त प्रार्थना करते आणि आशा करते की माझी आई माझ्याबद्दलच्या बातम्या वाचत नसावी. दुसरीकडे, अर्जुन कपूरने रिलेशनशिपच्या अफवांवर मौन पाळले होते.
वडिलांच्या मृत्यूनंतर मलायका अरोराला अर्जुन कपूरची का मिळाली साथ? अभिनेत्याने आता केला खुलासा!