Nehha Pendse Cannes Festival Look
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसेंची चर्चा होते. मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली नेहा सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नेहाने Cannes Film Festival 2025 मध्ये पदार्पण केलं आहे. अभिनेत्री नेहा पेंडसेला करिअरमध्ये पहिल्यांदाच कान्समध्ये जाण्याची संधी मिळाल्याने तिच्या आनंदाला उधाण आलं आहे. नेहाचा कान्स लूक चांगलाच व्हायरल झाला आहे.
इंदूच्या गोंधळलेल्या मनाच्या मदतीसाठी विठू पंढरपूरकरची एन्ट्री, मालिकेत कोणतं वळण येणार ?
अभिनेत्री नेहा पेंडसे हिने वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्या खास ब्रायडल कलेक्शनमधील पोल्की आणि पन्ना हार परिधान करून रेड कार्पेटवर दणक्यात एन्ट्री मारली होती. भारतीय कारागिरांनी केलेल्या कामाचे यातून कौतुक केले जात आहे. त्या दागिन्यांनी सर्वच उपस्थितांचे मन जिंकले. भारतातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या एका ज्वेलरी ब्रँड पैकी एक वामन हरी पेठे ज्वेलर्स आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी २०२५ च्या कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या दागिन्यांचा राजेशाही थाट जागतिक स्तरावर पोहोचवला आहे.
नेहाच्या सौंदर्याला साजेसा असा वामन हरी पेठे ज्वेलर्स यांचा हा हार कुशल कारागिरांनी तयार केला असून तो शाही वारशाची प्रेरणा आणि निसर्गदत्त पन्न्यांच्या ताजेपणाचा संगम दर्शवतो. पारंपरिक पोल्कीच्या मोठ्या सेटिंग्ज आणि हिरव्या पन्नाचे देखणे रंग तिच्या आधुनिक पोशाखाला एक अनोखा क्लासिक टच देत होते. हा हार तिच्या लूकला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आणि भारतीय कलाकुसरीला रेड कार्पेटवर ग्लोबल स्पॉटलाइटमध्ये आणून ठेवले.
अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित
११५ वर्षांहून अधिक काळ स्त्रियांच्या सौंदर्याला आणि आत्मविश्वासाला दागिन्यांच्या माध्यमातून साजरे करणाऱ्या वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी या ऐतिहासिक क्षणाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारतीय दागिन्यांच्या सौंदर्याची आणि परंपरेची साक्ष दिली. नेहा पेंडसे हिने परिधान केलेले हे खास पोल्की आणि पन्ना दागिन्यांचे सेट आता भारतातील निवडक वामन हरी पेठे ज्वेलर्स शोरूम्समध्ये उपलब्ध आहेत.