संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर ऋतुजा बागवेची पोस्ट, ट्रोलर्स आणि चाहत्यांचे मानले विशेष आभार
मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋतुजा तिच्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात असते. ‘नांदा सौख्य भरे’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेतून ‘लंडन मिसळ’ चित्रपटातून महाराष्ट्रातल्या घराघरात ऋतुजा बागवे प्रसिद्ध झाली आहे. मुख्य म्हणजे ‘अनन्या’ ह्या नाटकानेही तिला विशेष लोकप्रियता दिली. अलीकडेच ‘माती से बांधी दोर’ मालिकेतून ऋतुजा बागवेने हिंदी मालिकेत डेब्यू केले. अशातच ऋतुजाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिला नाटकामध्ये मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. तो पुरस्कार मिळाल्यानंतर तिने खास पोस्ट शेअर केली आहे.
‘लोक काहीही म्हणतील…’, असित मोदींनी TMKOC च्या ‘जेठालाल’सोबतच्या वादावर सोले मौन!
पुरस्कार मिळालेला फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणते,
“उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार २०२३ (रंगमंच अभिनय) संगीत नाटक अकादमी मी नाटकवेडी… तुला कोणत्या माध्यमात काम करायला जास्त आवडतं विचारल्यावर मी क्षणाचाही विलंब न घेता उत्तर देते “नाटक” इतका मोठा मानाचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा जरा मनात धस्स झालं, मनात आलं आपण फार काम केलं नाहीये आपण हा पुरस्कार डिझर्व्ह करतो का? (२२)एकांकिका, (२) प्रायोगिक नाटकं, (३) व्यावसायिक नाटक, पण जे काम केलं जीव ओतुन केलं एवढं मात्र नक्की आणि त्याची जेव्हा राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते तो आनंद आत्मा सुखावणारा असतो… आणि ह्यात मोलाचा वाटा आहे “अनन्या” नाटकाचा “अनन्या” नाटकाचे मी ३०० प्रयोग केले, ह्या नाटकाने कौतुक, पुरस्कार, समाधान, प्रसिद्धी, पैसा, मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम खुप काही दिलं… आज हा पुरस्कार मी “अनन्या”ला आणि माझ्या “अनन्या”च्या संपूर्ण टीमला डेडिकेट करते…. My all Theatre directors you have special place in my heart. forever grateful… All the haters, trollers, who disrespected me and discourage me. Thank you and my family, friends, well wishers, who supported me and believed in me, मायबाप रसिक प्रेक्षक ज्यांन्नी भरभरुन प्रेम दिलं क़ायम ऋणी राहीन. lots of love आणि कायमच संगीत नाटक अकादमीचे आभारी आहे… ”
बिग बॉसच्या घरामध्ये होणार पुन्हा एकदा शेर खानची एंट्री! सलमानला पाहून हिना झाली इमोशनल
ऋतुजा बागवेने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांसह अभिनेत्रीच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. स्पृहा जोशी, सिद्धार्थ बोडके, मधुरा देशपांडे, मधुरा गोडबोले, शर्वरी जोग, समृद्धी केळकरने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.