यशसारख्या चेहऱ्याचा फायदा घेऊन धर्माधिकाऱ्यांच्या कुटुंबात आलेला युग हा चोरीच्या उद्देशाने आलेला आहे हे कावेरी चांगलंच ओळखते. तोतया यशबद्दल घरात सगळ्यांना सांगायचं असून देखील तिला सांगता येत नाही. त्यामुळे युगचा मनमानी कारभार मनाविरुद्ध का होईना कावेरीला सहन करण्यापलिकडे पर्याय उरत नाही. अशातच घरात शिरलेला तोतया यश म्हणजे युग कावेरीच्या हतबलतेच्या गैरफायदा घेत चोरीचा प्रयत्न करतो. याचा नवा प्रोमो सोशल मीजियावर शेअर करण्यात आलेला आहे.
नव्या प्रोमोनुसार, युगला चोरीच्या आरोपाखाली पोलीस पकडून घेऊन जात असतात. त्यावेळी कावेरी युगला म्हणते की, माझ्या बांगड्या चोरल्यास तू ? यश सारखा दिसतोस म्हणून तू कधीच यश होऊ शकत नाहीस. यावर तोतया यश म्हणतो की आपण युग आहे. त्यावर कावेरी म्हणते की आय हेट यू. त्यावर युग म्हणतो की तू कोण मला हेट यू म्हणणारी. तुझ्यासारखी काकूबाई कोणाला हवीये? असं युग कावेरीला म्हणतो. हा एपिसोड 4 आणि 5 तारखेला प्रेक्षकांना पाहता येणार आहे. धर्माधिकाऱ्यांच्या घरात आलेला हा युग तोतया यश आहे की खऱ्या यशचा सत्य समोर आणण्यासाठीचा प्लॅन आहे. अनेक अनेक प्रश्वांची उत्तर येत्या काही एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहे. कावेरी या सगळ्या आव्हानांना कसं सामोरं जाणार या बाबत देखील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.






