(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
पूजा- सोहमच्या वेडिंग लूकने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या लग्नात पूजाने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे. त्यावर पिवळ्या रंगाची शाल घेतली आहे. तर सोहमने देखील पूजाच्या साडीला मॅचिंग होईल असा बेबी पिंक रंगाचा डिझायनर कुर्ता घातला आहे. यांच्या या लूकचे सर्वत्र कौतुक होत आहे. पूजा आणि सोहम आता साता जन्माचे सोबती झाले आहेत.
या सोहम आणि पूजाच्या लग्नासाठी अनेक मराठी कलाकार लोणावळ्यात पोहोचले आहेत. लेकाच्या लग्नात आदेश आणि सुचित्रा बांदेकरांनी सुद्धा खूप एन्जॉय केल्याचे दिसत आहे. या दोघांचा हळदी समारंभ काल मोठ्या उत्साहात पार पडला. या हळदी समारंभात सुकन्या मोने, ऋजुता देशमुख, अभिजीत केळकर, सचित पाटील, सुमीत राघवन. दीपाली विचारे यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. लग्न अगदी थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने पडले. लग्नाच्या मंडपात श्लोक लिहिलेले पडदे लावले असून, त्यामुळे संपूर्ण वातावरणात सकारात्मकता जाणवत आहे. कुटुंबीय आणि जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत हा सुंदर लग्नसोहळा पार पडला आहे.






