(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी मनोरंजनसृष्टी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक रजनीत पाटील यांचे निधन झाले आहे. वयाच्या 42व्या वर्षी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रजनीत पाटील यांचे निधन मनोरंजन विश्वासाठी मोठा धक्का ठरला आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराचे कार्यक्रम कोल्हापूरमध्ये त्यांच्या घरी पार पडले. त्यांच्या कामगिरीमुळे मराठी चित्रपट आणि नाटकसृष्टीत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
रणजित पाटीलच्या अकस्मात निधनाने मराठी मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि चाहते सोशल मीडियावर त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत आहेत. त्यांच्या चाहत्यांनी रणजितच्या कामगिरीसाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यातून त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम प्रकट होते. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वासाठी एक मोठी हानी झाली आहे.
अनेक नवोदित कलाकार घडवण्यात रणजित पाटील यांचा मोलाचा वाटा होता. रुपारेल कॉलेजमध्ये असताना त्याला अभिनयाची आवड लागली आणि त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. मुंबईतील अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये रणजित पाटीलने दमदार कामगिरी केली आणि पुरस्कार जिंकले. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्याने रुपारेल आणि रुईया कॉलेजमधील नाट्यविभागात एकांकिका बसवण्याचे काम जबाबदारीने हाताळले, ज्यामुळे अनेक युवा कलाकारांना अभिनयाच्या क्षेत्रात प्रोत्साहन मिळाले.
रणजित पाटील यांच्या दिग्दर्शनात नेहमी नाविन्यपूर्ण प्रयोग दिसून येत होते. चौकट मोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या दिग्दर्शनात सातत्याने केले. त्यांच्या कलाकृतींमध्ये माणसांच्या भावनांना केंद्रस्थानी ठेवणारी मांडणी आढळते, ज्यामुळे प्रेक्षक फक्त मनोरंजनासाठीच नव्हे तर सामाजिक आणि मानसिक दृष्टिकोनातूनही विचार करण्यास भाग पडतात. रणजित पाटील यांच्या दिग्दर्शनाने मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी! ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ मधील पहिलं शीर्षक गीत प्रदर्शित
रणजित पाटील यांनी अनेक नवोदित कलाकारांना नाटक शिकवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. नाटकातील बारकाव्यांचा ते खोल अभ्यास करत असे आणि विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असे की, “प्रोसेस महत्त्वाची आहे, बिनचूक प्रयोग करा.” या मार्गदर्शनातून अनेकांना अभिनय क्षेत्रात प्रेरणा मिळाली आणि त्यांनी रणजित पाटील यांच्या शिकवणुकीतून आपली कला अधिक प्रगल्भ केली.
रणजित यांनी झी मराठीवरील ह्दयी प्रीत जागते या मालिकेत अभिनय केला होता. रणजित यांनी साकारलेल्या अकंलच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होते.






