आज ३ एप्रिल रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज' यांची पुण्यतिथी आहे. महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 साली किल्ले रायगडावर झाला. यंदा शिवरायांचा 345 वा स्मृतिदिन आहे. तसेच प्रजेच्या हितासाठी अहोरात्र झटणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. त्यांच्या धाडसाच्या, शौर्याच्या कथा आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. तसेच त्यांच्या या कथा मोठ्या पडद्यावर अनेक अभिनेत्यांनी त्यांचे पात्र साकारून प्रेक्षकांपर्येंत पोहचवल्या आहेत. आज आपण याच अभिनेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
(फोटो सौजन्य - अकाउंट)
"तान्हाजी: द अनसंग वॉरियर" या २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये मराठी अभिनेता शरद खेलकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. अभिनेत्याचे तेव्हा खूप कौतुक झाले होते.
“मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” या मराठी चित्रपटामध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अत्यंत चोख आणि हुशारीने साकारली होती.
अभिनेता ते दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या "हिरकणी" या मराठी चित्रपटात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता.
“वेदात मराठे वीर दौडले सात” २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे.
चिन्मय मांडलेकर यांनी पावनखिंड, सुभेदार आणि शिवरायांचा छावा यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तसेच त्यांनी "फर्जंद" या चित्रपटात देखील शिवाजी महाराजांची भूमिका साकारली.
रितेश देशमुख दिग्दर्शित, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “राजा शिवाजी” या चित्रपटामध्ये अभिनेत्याने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून चाहत्यांना चकित केले.
२०२७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आणखी एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे, त्यांची व्यक्तिरेखा ऋषभ शेट्टी यांनी साकारली आहे. या चित्रपटाचे नुकतेच नवीन पोस्टर रिलीज झाले आहे.