अभिनेत्री जुई गडकरीची ‘लेखिका’ म्हणून नवी इनिंग्स (Photo Credit- X)
जुईचे खापर पणजोबा म्हणजेच गोविंदाग्रज – राम गणेश गडकरी, हे मराठी साहित्यविश्वातील थोर कवी, नाटककार आणि लेखक आहेत. त्यांच्या लेखनाच्या वारशाशी स्वतःचा दुवा जुळल्याचा आणि तो पुढे चालवण्याची संधी मिळाल्याचा जुईला अभिमान आहे. याच संदर्भात तिने आपले मनोगत व्यक्त केले.
ती म्हणते, “लिखाणाचा वारसा मला घरातूनच मिळाला आहे. माझे खापर पणजोबा राम गणेश गडकरी यांच्या साहित्याच्या पातळीवर पोहोचणं अशक्य आहे… पण लेखिका म्हणून मी एक पहिलं पाऊल टाकत आहे, याचा मला आनंद आहे. इतकी वर्षं दुसऱ्यांनी लिहिलेली पात्रं अभिनयातून उतरवण्याचा प्रयत्न केला. आज पहिल्यांदाच मी स्वतः कल्पनेतून काहीतरी साकारलं आहे आणि ते पडद्यावर येतंय याची उत्सुकता आहे.”
जुई गडकरीचा तो प्रसंग! “दिवसभर बसवून ठेवले, मालिकेतून काढले बाहेर…”
लहानपणापासून अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भावलेल्या जुईने आता लेखनाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तिच्या ‘अनसॉल्व्हड’ या वेबसिरीजकडे प्रेक्षकांचेही लक्ष लागले आहे. अभिनयातून लेखनविश्वाकडे टाकलेले हे जुईचे पाऊल मराठी कलाक्षेत्रासाठी एक नवा उत्साह घेऊन आले आहे.






