Bermuda Island : महासागराच्या मध्यभागी बर्म्युडा बेट कसं तयार झालं? हजारो वर्षापूर्वी समुद्रात काय घडलं होतं? जाणून घ्या (फोटो सौजन्य: iStock)
ॲमेझॉनच्या काळजात काय दडलंय? हजारो वर्षे जगापासून लपलेल्या ‘त्या’ जमातीचा उलगडा
विज्ञानानुसार, पृथ्वीच्या गर्भातील खडक वितळून त्यापासून लाव्हा तयार करण्यासाठी कार्बन एका इंधनासारखे काम करते. पण हा लाव्हा नक्की कुठून आला हे शोधण्यासाठी संशोधकांना झिंक धातूचा वापर केला. यापूर्वी वैज्ञानिकांचा समज होता की, समुद्राखाली असलेल्या जुन्या चुनखडीपासून लाव्हा तयार झाला. पण यामध्ये झिंकची पातळी न सापडल्याने हा समज मोडीत आला. यामुळे वैज्ञानिक अधिकच गोंधळले.
यानंतर त्यांनी कार्बन डायऑक्साइड पासून ते शिसे, झिंक, स्ट्रान्शिअम यांसारख्या धातूंची तपासणी केली. वैज्ञानिकांच्या मते हे धातू एका मेमरी कार्डसारखे काम करतात. यामुळे खडकाची निर्मिती कधी झाली, कशी झाली अशा ऐतिहासिक माहितीचा उलगडा होता. या खडकांची तपासणी केल्यावर शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की समुद्राच्या तळातील गाळापासून किंवा चुनखडीपासून या बेटाची निर्मिती झालेली नाही.
बेटाची निर्मिती जर ज्वालामुखीच्या उद्रेकातून किंवा पाण्याखालच्या खडकांपासून झाली नाही, तर नेमकी कशी झाली? तर वैज्ञानिकांच्या तपासानुसार, कोट्यावधी वर्षापूर्वी पृथ्वीवरील खंड एकत्र असताना, समुद्राच्या तळाखाली काही महाकाय प्लेट्स गाडल्या गेल्या होत्या. या वितळण्यासाछी प्रचंड उर्जेची गरज होती. पण अटालांटिक महासागरात असलेल्या काबर्नचा द्रवणांक (Melting Point) कमी होता. या कमी उण्षतेमुळे समुद्रातील खडक वितळून लाव्हा तयार होण्यास सुरुवात झाली होती.
या हालचालींमुळे शास्त्रज्ञांना स्पष्ट झाले की बर्म्युडाचा लाव्हा वर येत असताना खडकात रुपांतरित झाला आणि एक मोठे महाद्वीप तयार झाले. यातून बर्म्युडा ट्रॅंगलचा या विलक्षण, नेत्रदीपक अशा बेटाचा जन्म झाला. या संशोधनामुळे अटलांटिक महासागराच्या भूगर्भीय इतिहासाला एक वेगळे महत्व मिळाले आहे.






