फोटो सौजन्य - Social Media
नक्की काय म्हणाली अभिनेत्री?
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर मानखुर्द ब्रिजवरील वाहतूक कोंडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती म्हणते की, ” नमस्कार! मी आता गेल्या 5 तासांपासून मानखुर्द ब्रिजवर आहे. मी पुण्याकडे जात होती. आम्ही ट्राफिक कंट्रोल करणाऱ्या टीमला येथे बोलावले आहे. ते म्हणतात की धीर ठेवा. ट्राफिक खरंच अति आहे. तसेच त्यांना ही ट्राफिक कधी कमी होऊ शकते याची काहीच आयडिया नाही. आम्ही येथून मागेही फिरू शकत नाही.” तिने पोलिसांना विनंती केली आहे की, “काही मदत करू शकाल तर कृपया करून बाजूच्या ट्रॅकवरून ती लवकरात लवकर करण्यात यावी. लवकरात लवकर अपडेट द्या.” अभिनेत्री म्हणते की, “भूक लागलीये पण सांगू नाही शकत कारण जगात यापेक्षाही बिकट परिस्थिती लोकं जगतात”
एकंदरीत, मानखुर्द ब्रिजवर अभिनेत्री सोनाली गेल्या 5 तासांपासून अडकली आहे तसेच पोलिसांकडून मदतीची अपेक्षा करत आहे. मानखुर्द ब्रिज मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या महत्वाच्या मार्गांपैकी एक आहे. या ठिकाणी नियमित असणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रासले आहेत.
चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
सोनालीचे अनेक चाहते मुंबईकर आहेत आणि त्यातील बहुतेकांचा हा दररोजचा मार्ग आहे. त्यांनीही त्यांच्या अडचणी शेअर केल्या आहेत. तर सध्या महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा आहे. अशामध्ये सोनाली कुलकर्णीने महाराष्ट्र पोलिसांना घातलेली साद कदाचित मराठी भाषेत असती तर नक्कीच बरं वाटलं असतं अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.






