नेपाळचं धक्कादायक कृत्य! भारताच्या नकाशाशी छेडछाड करणं पडलं महागात, 'ती' पोस्ट डिलीट करुन मागतली माफी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या सरकारी विमान कंपनी नेपाळ (Nepal) एअरलाईन्सने भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केला होता. या नकाशात भारताचा अविभाज्य भाग असलेला जम्मू-काश्मीरचा प्रदेश पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवण्यात आला होता. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली होताच यावर भारतीयांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
नेपाळच्या सरकारी एअरलाईन्सने अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली होती. यावर जागतिक नेटवर्क नकाशाचा फोटो शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये जम्मू-काश्मीरचा संपूर्ण भाग पाकिस्तानच्या सीमेत दाखवण्यात आला होता. यामुळे भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती. नेपाळचे हे कृत्य भारताच्या अखंडतेला धक्का पोहचवणारे असल्याचे लोकांनी म्हटले. नेटकऱ्यांनी याला जाणीवपूर्वक केलेली चूक सांगत तीव्र संताप व्यक्त केला होता.
या प्रकरणावर भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव यानी तीव्र टीका केली. त्यांनी पोस्ट करत विचारले की, नेपाळने कोणाशी विचारुन भारताच्या नकाशाशी छेडछाड केली आहे? ही तांत्रिक चूक नव्हे, तर जाणीपूर्वक केलेले कृत्य आहे.अनेक नेटकऱ्यांनीही नेपाळ भारताचे उपकार विसरला का असा प्रश्न करत जाब विचारला.
भारताने नेपाळला केलेल्या मदतींचा उल्लेख नेपाळच्या अर्थव्यस्थेला उभारले असल्याचे म्हटले. मुक्त सीमा, लाखो नेपाळी नागरिकांना रोजगार, इंधन पुरवठा आणि आपत्कालीन संकटात मदत केली असून नेपाळचे अशा प्रकारचे कृत्य चिथावणी देणार आहे, असे नेटकऱ्यांनी म्हटले.
दरम्यान वाढता विरोध पाहता नेपाळच्या एअरलाईन्स अखेर वादग्रस्त पोस्ट डिलीट केली. यानंतर कंपीनेने नकाशात तांत्रिक चुक झाल्याचे स्पष्टीकरण दिले. सरकार आणि नेपाळ एअरलाईन्सचा असा कोणताही हेतू नव्हता, ही केवळ एक तांत्रिक चूक आहे. या चुकीबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो असे म्हटले.
Salary Policy : सरकारी कर्मचाऱ्यांना आता महिन्यातून दोनदा पगार मिळणार; नव्या सरकारचा मोठा निर्णय
Ans: नेपाळच्या सरकारी एअरलाईन्सने अधिकृत एक्स अकाऊंटवर जागतिक नेटवर्क नकाशाचा फोटो शेअर केला आहे. या नकाशात भारताचा अविभाज्य भाग असलेला जम्मू-काश्मीरचा प्रदेश पाकिस्तानचा भाग दाखवले होता.
Ans: नेपाळच्या जम्मू-काश्मीरला भारताचा भाग दाखवल्याने भारतीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे कृत्या जाणीवपूर्वक करण्यात आले असून नेपाळ भारताची मदत विसरला असल्याचे भारतीयांनी म्हटले.
Ans: नेपाळने स्पष्ट केले की, नेपाळ सरकारचा किंवा एअरलाईन्सचा असा कोणताही हेतू नव्हता, ही केवळ एक तांत्रिक चूक आहे. यानंतर पोस्टही डिलीट करण्यात आली आहे.






